घोटीत संतप्त जमावाकडून रुग्णालयाची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:43 AM2018-01-21T00:43:18+5:302018-01-21T00:45:28+5:30

घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील भंडारदरा मार्गावरील गुरुकृपा रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जी-पणामुळे नवजात शिशुसह अकरा वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त जमावाने सोमवारी रुग्णालयाची तोडफोड केली. दरम्यान या हॉस्पिटलचा परवाना दुसºयाच डॉक्टरच्या नावे असून, घोटी येथील ७ डॉक्टर हे रुग्णालय चालवितात, अशी गंभीर बाब समोर आली आहे.

The hospital collapsed with a ghautite angry mob | घोटीत संतप्त जमावाकडून रुग्णालयाची तोडफोड

घोटीत संतप्त जमावाकडून रुग्णालयाची तोडफोड

Next
ठळक मुद्देडॉक्टरांच्या हलगर्जी-पणामुळे नवजात शिशुसह अकरा वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू हॉस्पिटलचा परवाना दुसºयाच डॉक्टरच्या नावे

घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील भंडारदरा मार्गावरील गुरुकृपा रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जी-पणामुळे नवजात शिशुसह अकरा वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त जमावाने सोमवारी रुग्णालयाची तोडफोड केली. दरम्यान या हॉस्पिटलचा परवाना दुसºयाच डॉक्टरच्या नावे असून, घोटी येथील ७ डॉक्टर हे रुग्णालय चालवितात, अशी गंभीर बाब समोर आली आहे.
घोटी शहरातील महाराणा प्रताप चौकातील अश्विनी ज्ञानेश्वर भोर यांना प्रसूतीसाठी रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास गुरु कृपा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत नाशिकहून डॉक्टर येईपर्यंत ताटकळत ठेवण्यात आले. रात्री सुस्थित आलेल्या महिलेला प्रसूती कळांचा जोर वाढल्याने डॉ. कडून सिजरीन करण्यात आले. त्यात निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाला. बाळ दगावल्याने नातेवाइकांनी आक्र ोश केला. दरम्यान याच वेळेत फांगुळगाव येथील कविता भगवान दुभाषे या अकरा वर्षीय
विद्यार्थिनीस पायास सूज आल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची परिस्थितीदेखील चांगली असतांना पुढील उपचारासाठी तिला रुग्णालयात ठेवण्यात आले होते, दरम्यान सकाळी आठ वाजेदरम्यान उपचारासाठी दिलेल्या इंजेक्शनमुळे तीला भुवळ येण्यास सूरवात झाली. याबाबत डॉक्टरांना सांगितले असता त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने रु ग्णालयातच मुलीने प्राण सोडले. दोन्ही घटना एकाच वेळेस घडल्याने शहरभर त्याची चर्चा पसरली. अनेक नागरीकांनी घटनास्थळी धाव घेत संतप्त जमावाने रूग्णालयाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती काबूत आण्याचा प्रयत्न केला.
घोटी शहरात ही बातमी पोहचताच प्रचंड जनसमुदायासह मृतांचे नातेवाईक गोळा झाले होते. त्यांनी रुग्णांना वाºयावर सोडून पळून गेलेल्या डॉक्टरांवर खुनाचा गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतल्याने परिस्थिती गंभीर झाली होती. अखेर पोलीसांनी ५ डॉक्टरांना ताब्यात घेतल्यानंतर जमाव शांत झाला. याप्रसंगी उपस्थित जन समुदायासह मृतांच्या नातेवाईकांनी बोगस डॉक्टरांवर कारवाई व्हावी व या बोगस डॉक्टरांना अभय देणाºया तालुका वैद्यकिय अधिकाºयास निलंबित कारवे अशी मागणी केली. या आशयाचे निवेदन उपविभागीय ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांना देण्यात आले. संशयीतांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन झेंडे यांनी दिले.
घटनेचे गांभीर्य पाहता उपविभागीय ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल झेंडे घटनास्थळी तळ ठोकून होते. साहायक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी तातडीने शहरातील लोकप्रतिनिधींना बोलावत जमावास शांत राहण्याचे आवाहन केले. संशयीत डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याप्रकरणी सहायक पोलीस निरिक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शानाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंदा माळी, विलास घिसाडी पुढील तपास करत आहेत.
 

Web Title: The hospital collapsed with a ghautite angry mob

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :docterडॉक्टर