रुग्णालय निवडीसाठीची माहिती गुगल डॅशबोर्डवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 11:30 PM2020-06-25T23:30:43+5:302020-06-25T23:31:10+5:30

नाशिक : ज्या नागरिकांना आपल्या तब्येतीबाबत काही शंका वाटल्यास त्या नागरिकाला जवळपासची कोविड तपासणी करू शकणारी मान्यताप्राप्त लॅब सुविधा कुठे मिळू शकेल? शासकीय, मनपा किंवा मान्यताप्राप्त कोविडच्या खासगी रुग्णालयात जायचे असेल तर जवळचे हॉस्पिटल कुठले? तिथे बेड उपलब्ध आहेत का? कोणकोणत्या सुविधा आहेत? या सर्व बाबींची माहिती नाशिककरांना मिळू शकणार आहे.

Hospital selection information on Google Dashboard! | रुग्णालय निवडीसाठीची माहिती गुगल डॅशबोर्डवर !

रुग्णालय निवडीसाठीची माहिती गुगल डॅशबोर्डवर !

Next
ठळक मुद्देउपयुक्त तंत्र : कोरोनाचा संशय असणाऱ्या नागरिकांना स्वत:च हॉस्पिटल निवडण्याची सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : ज्या नागरिकांना आपल्या तब्येतीबाबत काही शंका वाटल्यास त्या नागरिकाला जवळपासची कोविड तपासणी करू शकणारी मान्यताप्राप्त लॅब सुविधा कुठे मिळू शकेल? शासकीय, मनपा किंवा मान्यताप्राप्त कोविडच्या खासगी रुग्णालयात जायचे असेल तर जवळचे हॉस्पिटल कुठले? तिथे बेड उपलब्ध आहेत का? कोणकोणत्या सुविधा आहेत? या सर्व बाबींची माहिती नाशिककरांना मिळू शकणार आहे.
नाशिकमधील सर्व रुग्णालयांची माहिती संकलित करून अशा स्वरुपाचे ‘गुगल आॅक्युपन्सी डॅशबोर्ड’ तयार करण्याच्या कामाला वेग देण्यात आला असून, नागरिकांना पुढील आठवड्यापासून ही सुविधा उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत.
कोणत्याही कुटुंबातील माणसाला घशाची किंवा सर्दी-तापाची समस्या जाणवू लागली की सर्वप्रथम त्याला कोरोनाचा संशय मनात येतो. आपल्यामुळे आपल्याच कुटुंबातील नागरिकांना बाधा होऊ नये, हाच पहिला विचार नागरिकांच्या मनात येतो. अशावेळी कोरोनाची चाचणी करणारी शासकीय, मनपा किंवा खासगी मान्यताप्राप्त लॅब कुठली, याबाबतची माहिती या अनोख्या डॅशबोर्डद्वारे एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. तसेच थेट रुग्णालयात जाऊन डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यायची असल्यास शासकीय आणि खासगी रुग्णालयाच्या उपलब्धतेबाबत तसेच तेथील सुविधांबाबतही सर्व माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्या रुग्णालयांना महात्मा जोतिबा फुले जीवनदायी योजना लागू आहे, अशा ठिकाणी रु ग्णभरती झाल्यास त्या रुग्णाचे बिल कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर जीवनदायी योजनेमधून शासकीय दरानुसार प्रदान करण्यात येणार आहे. महात्मा फुले योजनेंतर्गत हॉस्पिटल्सची यादी प्रसिद्ध शासन निर्देशानुसार कोविड मान्यताप्राप्त खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रु ग्णावर उपचार करण्यासाठी आकारावयाचे दर निर्देशित करण्यात आलेले आहेत. रु ग्णाचे बिल करताना त्या बिलाची आकारणी शासन निर्णयानुसार करण्याचे आदेश खासगी रुग्णालयांना करण्यात आले आहे. सध्या संबंधित रु ग्णालयांची माहिती व त्यांचे संपर्क क्र मांक मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. तसेच महात्मा जोतिबा फुले योजनेंतर्गत हॉस्पिटल्सची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.रुग्णालयांबाबतची माहिती संकलित करून तेथील बेड, सुविधांची माहिती अपडेट करून देण्यात आली आहे. तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर अवघ्या चार-पाच दिवसांत गुगलवरून बेड आॅक्युपन्सी डॅशबोर्डवर ही माहिती मिळू शकणार आहे. - डॉ. आवेश पलोड,
वैद्यकीय अधिकारी

Web Title: Hospital selection information on Google Dashboard!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.