रूग्णालये रिकामे तरीही नवीन कोविड सेंटर्सचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 12:17 AM2020-09-18T00:17:44+5:302020-09-18T01:27:44+5:30

नाशिक: शहरात कोरोनाचे रूग्ण वाढत असताना रूग्णालयात खाटा मिळत नसल्याची तक्रार आहेत. त्यामुळे महापालिका आता संभाजी स्टेडीयम येथेही नवीन कोविड सेंटर उभारणीची तयारी सुरू असली तरी प्रत्यक्षात मात्र, महापालिकेचे अनेक रूग्णालये पडुन आहेत. गंगापूर रूग्णालय, विल्होळी तसेच तपोवन येथील कोविड सेंटर्स कार्यन्वीत नसून त्यामुळे सुमारे दोनशे खाटा उपलब्ध होणे शक्य असातान देखील त्यादृष्टीने प्रयत्न केले जात नाही. मुलतानपुरा येथे छोटे रूग्णालय कार्यान्वीत झाले तरी किमान तेथे पंचवीस रूग्णांची सोय होऊ शकते. मात्र, जागा उपलब्ध असताना देखील त्यात व्यवस्था नसल्याने रूग्णांना दारोदार भटकतींची वेळ आली आहे.

Hospitals empty but new Covid Centers ghat | रूग्णालये रिकामे तरीही नवीन कोविड सेंटर्सचा घाट

रूग्णालये रिकामे तरीही नवीन कोविड सेंटर्सचा घाट

Next
ठळक मुद्देअजब कारभार: गंगापूर रूग्णालय पूर्णता बंद, विल्होळी, तपोवनच्या खाटा रिक्तच

नाशिक: शहरात कोरोनाचे रूग्ण वाढत असताना रूग्णालयात खाटा मिळत नसल्याची तक्रार आहेत. त्यामुळे महापालिका आता संभाजी स्टेडीयम येथेही नवीन कोविड सेंटर उभारणीची तयारी सुरू असली तरी प्रत्यक्षात मात्र, महापालिकेचे अनेक रूग्णालये पडुन आहेत. गंगापूर रूग्णालय, विल्होळी तसेच तपोवन येथील कोविड सेंटर्स कार्यन्वीत नसून त्यामुळे सुमारे दोनशे खाटा उपलब्ध होणे शक्य
असातान देखील त्यादृष्टीने प्रयत्न केले जात नाही. मुलतानपुरा येथे छोटे रूग्णालय कार्यान्वीत झाले तरी किमान तेथे पंचवीस रूग्णांची सोय होऊ शकते. मात्र, जागा उपलब्ध असताना देखील त्यात व्यवस्था नसल्याने रूग्णांना दारोदार भटकतींची वेळ आली आहे.
कोरोना मुळे महापालिकेने आपली यंत्रणा पुरेशी नसल्याने खासगी रूग्णालये ताब्यात घेतली असली तरी महापालिकेच्या स्वमालकीची रूग्णालये अक्षर: पडून आहे विशेष म्हणजे महापालिकेने सध्या कोरोनासाठी घाईघाईने वेबसाईट आणि अ­ॅप तयार करून त्यात रियल टाईम माहिती देण्याची व्यवस्था केली असली तरी त्यातच या उणिवा स्पष्ट होत आहते. गेल्या मंगळवारी झालेल्या महासभेत वैद्यकिय अधिक्षक डॉ बापुसाहेब नागरगोजे यांनी शहरात ५७ कोविड सेंटर्स तर १३२ व्हेंटीलेटर्स उपलब्ध आहेत, अशी माहिती दिली होती.
शहरात ९ कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. त्यांची क्षमता १ हजार ७३५ खाटांची आहे. महापालिकेच्या नवे बिटको रुग्णालय २०० खाटांचे असून त्यात १०० खाटा आॅक्सीजनच्या तयार करण्यात आल्या आहेत. त्याच प्रमाणे गरजेनुसार ४८ खासगी कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहेत. त्यात १ हजार ३३४ खाटा आहेत. त्यापैकी ५७७ आॅक्सीजन बेड, २६३ आयसीयू बेड आणि ६९
व्हेंटीलेटर्स उपचारासाठी उपलब्ध आहेत. कोरोना रूग्णालयात ६३० खाटा असून ३६५ आॅक्सीजन बेड आहेत तसेच १०९ आयसीयू बेड आणि ६३ व्हेंटीलेटर्स आहेत.
डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात १५० खाटा, १०० आॅक्सीजन बेड, २० आयसीयू बेड व ९ व्हेंटीलेटर्स आहेत. नाशिक शहरात सरकारी व खासगी रुग्णालय मिळून एकूण ९४२ आॅक्सीजन बेड, ३५८ आयसीयू बेड व १३२ व्हेंटीलेटर्स सुविधा उपलब्ध आहे , असा दावा त्यांनी केला होता. मात्र, दुसरीकडे महापालिकेचे अनेक रूग्णालये आणि कोविड केअर सेंटर्स नावाला असल्याचे देखील आढळत आहे.
महापालिकेच्या गंगापूर रूग्णालय ४० खाटांचे रूग्णालय जैसे थे पडून आहे.
याठिकाणी डॉक्टर आणि अन्य कर्मचारी आहेत. मात्र, प्रशासन ते कार्याान्वीत करण्यास अनुत्सूक दिसते. तपोवन येथे सुरूवातील तयार करण्यात आलेले कोरंटाईन सेंटरचे नंतर कोविड सेंटरमध्ये रूपांतर करण्यात आले. मात्र येथील चाळीस खाटांचे रूग्णालय देखील बंद आहे. विल्होळी जवळ महापालिकेच्या खत प्रकल्पाजवळील प्रशिक्षण केंद्रात तब्बल शंभर खाटा दर्शविण्यात आले आहेत. वडाळा येथे ६० खाटा आणून ठेवण्यात आल्या आहेत.
मात्र तेथे रूगम्हणजे इनअ­ॅक्टिव्ह म्हणजे बंद आहे. केवळ हे रूग्णालय आणि कोविड सेंटर सुरू करण्यात आले तरी १८० रूग्णांची सोय होऊ शकेल. मुलतानपुरा येथे देखील रूग्णालय दोन नगरसेवकांच्या वादात अजुनही रूग्णालय सुरू होऊ शकलेले नाही. म्हणजे महापालिकेने पुर्ण क्षमतेने रूग्णालय सुरू केले तरी किमान दोनशे ते अडीचशे रूग्णांची सोय होऊ शकेल. मात्र अशा अपु-या यंत्रणेमुळेच खासगी रूग्णालयांचा आसरा घ्यावा लागत आहे. विशेष म्हणजे मनपाची रूग्णालये बंद आणि दुसरीकडे आता सिडकोतील संभाजी स्टेडीयम येथे नव्याने कोविड सेंटर सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. त्यावर खर्च करण्या आधी अगोदरच्या यंत्रणा कार्यान्वीत करण्यात येत आहे.

मनपाच्या डॅश बोर्डवर गंगापूर रूग्णालय, तपोवन आणि विल्होळी सेंटर इन अ­ॅक्टिव दाखवले जात आहे. वास्तविक अशाप्रकारे विभागनिहाय कोविड सेंटर सुरू केले तर त्या त्या भागात रूग्णांना जवळच सोय होऊ शकते. आज गंगापूर गावातील रूग्णालय बंद असल्याने तेथील रूग्णाला देखील डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयात दाखल करण्यास हेल्पलाईनवर सांगितले जाते विलंबाने रूग्ण दाखल
होण्याच्या घोळात एखाद्या रूग्णाचा मृत्यू होऊ शकतो.
- वर्षा भालेराव, नगरसेविका, सातपूर

मनपाच्या हेल्पलाईनवर दुरध्वनी केल्यास वेबसाईट बघण्यास सांगितले जाते. त्यातील महिती आणि प्रत्यक्ष स्थिती जुळत नाही. कोविड अ­ॅप तर जुलै महिन्यातच बंद पडले आहेत, त्यात अपडेट नाही, या कथीत रियल टाईम यंत्रणेत आधी सुधारणा करण्याची गरज आहे.


 

 

Web Title: Hospitals empty but new Covid Centers ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.