'हॉटेल बंद'चा मनपाच्या वीजनिर्मितीला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 01:35 AM2020-08-31T01:35:52+5:302020-08-31T01:36:15+5:30
लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होत असले तरी हॉटेल्स पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास मनाई आहे. त्याचा फटका महापालिकेच्या खतप्रकल्पातील वीजनिर्मितीला बसल आहे. हॉटेलचा ग्रीन वेस्ट आणि सार्वजनिक शौचालयांचे मलजल या माध्यमातून निर्माण होणाऱ्या वीजनिर्मितीस अडथळे येत असल्याने अवघे २५ ते३० युनिट्सीची वीजनिर्मिती होत आहे.
नाशिक : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होत असले तरी हॉटेल्स पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास मनाई आहे. त्याचा फटका महापालिकेच्या खतप्रकल्पातील वीजनिर्मितीला बसल आहे. हॉटेलचा ग्रीन वेस्ट आणि सार्वजनिक शौचालयांचे मलजल या माध्यमातून निर्माण होणाऱ्या वीजनिर्मितीस अडथळे येत असल्याने अवघे २५ ते३० युनिट्सीची वीजनिर्मिती होत आहे.
महापालिकेच्या वतीने पाथर्डी येथील खतप्रकल्पाच्या जागेतच हा वीजनिर्मिती प्रकल्प साकारला आहे. जर्मन सरकारच्या मदतीने शहरातील सांडपाण्याचे व्यवस्थापन यावर दहा वर्षांपूर्वी कृती आराखडा तयार करण्यातआला होता. त्यातील सूचनेनुसार हा प्रकल्प कार्यान्वीत करण्यात आला आहे.शहरातील हॉटेल्समधील ग्रीन कचरा याठिकाणी आणला जातो आणि शहरातील सार्वजनिक मलजल याठिकाणी आणून त्यातून मिथेन वायुच्या माध्यामतून वीजनिर्मिती केली जाते. ही विज निर्मिती झाल्यानंतर ती महावितरणच्या ग्रीडमध्ये पाठविली जाते. तसेच काही प्रमाणात विजेचा वापर केला जातो.महावितरणला विकलेल्या विजेच्या माध्यमातून मनाच्या विजेच्या बिलाचेसमायोजन केले जाते. महापालिकेच्या या पथदर्शी प्रकल्पात दररोज सुमारेसाडे चारशे ते पाचशे युनीटस विज तयार होते.
मात्र, आता ते प्रमाण प्रचंडघटले आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मार्च महिन्याच्या अखेरीस पासून सर्व उद्योगबंद करण्यात आले आहेत. यात हॉटेल्सचा समावेश आहे. आज मिशेन बिगेन सुरूअसताना देखील हॉटेल्सला केवळ पार्सल सेवेची परवानगी आहे. लॉजींगसाठी केवळ२५ टक्केच खोल्या देऊ शकतात. या सर्वाचा हॉटेलच्या कचरा निर्माण होण्यावरपरीणाम झाला आहे. हॉटेल वेस्ट (कचरा) मिळत नसल्याने वीज निर्मितीवर देखीलपरिणाम झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
फर्नेश आॅइल निर्मितीत घट
लॉकडाऊनमुळे हॉटेल्स बंद असल्याने महापालिकेच्या वीजनिर्मितीला त्याचा फटका बसला आहे. परंतु त्याचबरोबर सध्या अपेक्षित प्लॅस्टिक मिळत नसल्याने फर्नेश आॅईल निर्मितीतदेखील घट झाली आहे. त्यामुळे त्याचेही उत्पादन कमी झाले आहे.