हॉटेल व्यावसायिकांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:13 AM2021-04-10T04:13:57+5:302021-04-10T04:13:57+5:30

------------------------------------------- ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या विकास कामांसाठी निधी सिन्नर : ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत सिन्नर विधानसभा मतदार संघात समावेश असलेल्या ६ ...

Hoteliers fined | हॉटेल व्यावसायिकांना दंड

हॉटेल व्यावसायिकांना दंड

Next

-------------------------------------------

ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या विकास कामांसाठी निधी

सिन्नर : ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत सिन्नर विधानसभा मतदार संघात समावेश असलेल्या ६ देवस्थानच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ५४ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे या देवस्थानच्या विकासात भर पडण्यास मदत होणार आहे.

-----------------------------------

डुबेरेत कोरोना विषाणूबाबत जनजागृती

सिन्नर : तालुक्यातील डुबेरे ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना जनजागृती दिन पाळण्यात आला. जनजागृती फेरी काढून ग्रामस्थांना नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले. नियम पाळा, कोरोना टाळा असे आवाहन करण्यात आले.

-------------------------------------

कांद्याचा उत्पादन खर्च निघेना

सिन्नर : बाजार समितीत गेल्या काही दिवसापासून लाल व उन्हाळ असे दोन्ही प्रकारचे कांदे दाखल झाले आहेत. तसेच कांदा दरातही मोठी घसरण झाली आहे. सध्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहे.

----------------------------------------

नांदूरशिंगोटेत ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या नांदूरशिंगोटे येथील उपकेंद्रात ज्येष्ठ नागरिकांना तसेच ४५ वर्षावरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण करण्यात आले.

------------------------------

समृद्धीची अवजड वाहतूक डोकेदुखी

वावी : तालुक्यातील वावी परिसरात समृद्धीच्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे येथील काही तरूणांनी वावी-पिंपरवाडी रस्त्यावर चालणाऱ्या अवजड वाहनांना वाहतुकीसाठी मज्जाव केला.

Web Title: Hoteliers fined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.