मृत विद्यार्थिनीच्या पालकांना बांधून दिले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 12:26 AM2020-02-10T00:26:57+5:302020-02-10T00:53:06+5:30

पक्के घर नसल्याने विद्यार्थिनीला रात्री सर्पदंश होऊन तिचा मृत्यू झाल्याची घटना सन २०१६ मध्ये तालुक्यातील पेहरेवाडी येथे घडली होती. या घटनेची रूखरूख लागून शाळेतील शिक्षकाने शासनदरबारी पाठपुरावा करून या विद्यार्थिनीच्या पालकांना पक्के घर बांधून दिले.

A house built for the parents of a deceased student | मृत विद्यार्थिनीच्या पालकांना बांधून दिले घर

मृत विद्यार्थिनीच्या पालकांना बांधून दिले घर

Next
ठळक मुद्देपक्के घर नसल्याने घडली होती दुर्घटना

इगतपुरी : पक्के घर नसल्याने विद्यार्थिनीला रात्री सर्पदंश होऊन तिचा मृत्यू झाल्याची घटना सन २०१६ मध्ये तालुक्यातील पेहरेवाडी येथे घडली होती. या घटनेची रूखरूख लागून शाळेतील शिक्षकाने शासनदरबारी पाठपुरावा करून या विद्यार्थिनीच्या पालकांना पक्के घर बांधून दिले.
तालुक्यातील पेहरेवाडी येथील विद्यार्थिनी सविता अमृता खडके हिचे घरी झोपेत सर्पदंशाने निधन झाले होते. यानंतर इगतपुरी शिक्षक समितीचे पदाधिकारी हरिश्चंद्र दाभाडे यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे सतत पाठपुरावा करून सदर विद्यार्थिनीच्या पालकांना आॅगस्ट २०१८ मध्ये राजीव गांधी अपघात विमा योजनेचे ७५ हजार रु पये प्राप्त करून दिले होते. पक्के घर नसल्यामुळेच ही दुर्दैवी घटना घडली याची रूखरूख त्यांच्या मनाला सतत लागून होती.
सविताच्या पालकांचे कुडामातीचे कच्चे घर असल्याने निष्पाप विद्यार्थिनीचा नाहक जीव गेला आहे. तेव्हा त्या पालकांना पक्के घर हवे म्हणून शिक्षकाने प्रयत्न केले. दाभाडे यांनी मृत विद्यार्थिनीच्या पालकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने पुढाकार घेऊन स्वत:चे ७५००० रु पये खर्च करून घर बांधून दिले व सामाजिक बांधिलकी जपली त्यांच्या मित्र मंडळींनी ही त्यांच्या ह्या कार्यास मदत केली.

Web Title: A house built for the parents of a deceased student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.