जयपूर येथे घर कोसळले; दोन लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 09:50 PM2020-08-09T21:50:31+5:302020-08-10T00:29:12+5:30
सटाणा : तालुक्यातील जयपूर येथे पावसामुळे घर कोसळून दोन लाख रु पयांचे नुकसान झाल्याची घटना घडली.
सटाणा : तालुक्यातील जयपूर येथे पावसामुळे घर कोसळून दोन लाख रु पयांचे नुकसान झाल्याची घटना घडली.
मोसम खोऱ्यात समाधानकारक पावसामुळे बळीराजा सुखावला असला तरी काही ठिकाणी मातीची घरे धोकेदायक बनली आहेत. जयपूर येथील शेतकरी दिलीपसिंग रंगराव खैरनार हे कुटुंबियांसमवेत शेतात गेले असता पावसामुळे अचानक त्यांच्या घराची भिंत कोसळल्याने संसारोपयोगी वस्तू, धान्य आदीचे नुकसान झाले. भीज पावसामुळे संपूर्ण छत कोसळले असून खैरनार यांचा संसार उघड्यावर पडला आहे. दरम्यान, तलाठी व मंडळ अधिकारी खरे यांनी पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयात सादर केला आहे. नैसर्गिक आपत्ती म्हणून भरपाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी सांगितले.