ब्राह्मणगाव येथे घरफोड्यांचे सत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 06:42 PM2019-06-21T18:42:25+5:302019-06-21T18:42:51+5:30

ब्राह्मणगाव येथील हेरंब गणपती मंदिराजवळील नंदिनी शेवाळे तसेच महा ई सेवा केंद्रा जवळील जिभाऊ खरे हे घरमालक बाहेरगावी गेलेले असतांना मध्यरात्री बंद घराचे कुलूप कटरच्या साह्याने तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली.

House Foos Session at Brahmanga Nagar | ब्राह्मणगाव येथे घरफोड्यांचे सत्र

ब्राह्मणगांव येथील नंदिनी शेवाळे यांच्या घरात कपाटातील चोरीस गेलेल्या वस्तूंची पाहणी करतांना पोलीस उपनिरीक्षक गणेश बुवा.

Next
ठळक मुद्देनागरिकांमध्ये घबराट : लाखाचा ऐवज लंपास

ब्राह्मणगाव : येथील हेरंब गणपती मंदिराजवळील नंदिनी शेवाळे तसेच महा ई सेवा केंद्रा जवळील जिभाऊ खरे हे घरमालक बाहेरगावी गेलेले असतांना मध्यरात्री बंद घराचे कुलूप कटरच्या साह्याने तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली.
सविस्तर माहिती अशी की हेरंब गणपती मंदिराजवळील नंदिनी धर्मा शेवाळे हे बाहेरगावी गेलेले होते,बंद घर असल्याने बुधवारीमध्यरात्री चोरट्यांनी कटरच्या साह्याने दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत चार तोळे सोन्याची पोत, साडे चार ग्रॅम सोन्याचे कानातले टॉप्स,व रोख रक्कम आठरा हजार रु पये असा एकूण एक लाख छत्तीस हजार पाचशे रु पयांचा ऐवज चोरून नेला. सदर घटना गुरु वारी (20) रोजी शेवाळे यांच्या घरासमोरील दिलीप नेरकर यांच्या पत्नी घराबाहेर आले असता समोरील शेवाळे यांच्या घराकडे लक्ष गेले तेव्हा दरवाजाचे कुलूप नसल्याचे दिसून आले तेव्हा त्यांनी पती दिलीप नेरकर यांना सांगितले,श्री.नेरकर यांनी शेवाळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून दरवाजाचे कुलूप तुटल्याचे सांगितले असता शेवाळे यांनी घडलेली घटना पोलीस पाटील मालपाणी यांना सांगितली,त्वरीत पोलीस पाटील मालपाणी घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी घरफोडी झाल्याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गणेश बुवा, पोलीस नाईक अतुल आहेर,
पोलीस कान्स्टेबल धनंजय बैरागी यांनी पाहणी करून पंचनामा केला.
पाहणी दरम्यान अजून एका ठिकाणी चोरी झाल्याची माहिती मिळाली, महा ई सेवा केंद्र जवळील जिभाऊ दोधा खरे यांच्या घराच्या चैनल गेटचे दोन कुलूप, तर दरवाजाचे बाहेरील गेट व दरवाजाचे कुलूप कटरच्या साह्याने चोरट्यांनी तोडल्याचे निदर्शनास आले,परंतु चोरट्यांच्या हाती काही नाही लागल्याने त्यांनी कपाटाच्या काचा फोडून आर्थिक नुकसान केले.
याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी श्वानपथक यांना पाचारण करण्यात आले होते, श्वानने जिभाऊ खरे यांच्या घरापासुन ते महालपाटणे चौफुली पर्यंत दिशा दाखवली.मात्र चोर याठिकाणा पासून वाहनाने पसार झाल्याचे निष्पन्न झाले.
गस्त वाढविण्याची मागणी
गावात सतत होत असलेल्या घरफोड्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत, फेब्रुवारी महिन्यात प्रताप शिरोडे बाहेरगावी गेलेले असतांना यांच्या घरी मध्यरात्री घरफोडी, तर मागील मिहन्यात देशी दारू दुकान,आदर्श आटो केअर अशा ठिकठिकाणी बंद असलेले दुकान व गावांत मध्यरात्रीच्या वेळी घरफोडीमुळे पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: House Foos Session at Brahmanga Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.