मानोरी येथे घरोघर आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 09:14 PM2020-07-18T21:14:43+5:302020-07-19T00:43:37+5:30
मानोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानोरी बुद्रुक येथे आरोग्य विभागातर्फे घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आरोग्य तपासणीसाठी आवश्यक किट ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिले आहे.
मानोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानोरी बुद्रुक येथे आरोग्य विभागातर्फे घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आरोग्य तपासणीसाठी आवश्यक किट ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिले आहे. गावातील सुमारे ३५० कुटुंबांतील प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करताना रक्तातील आॅक्सिजनचे प्रमाण, ताप, घरात आजारी असलेल्या व्यक्तींची माहिती संकलित करण्यात येत आहे. सरपंच नंदाराम शेळके, ग्रामसेवक विलास कवडे, आरोग्यसेवक नितीन व्यवहारे, गटप्रवर्तकवर्षा सुताणे, शिक्षक राजेंद्र शिंपी, आशा सुवर्णा भवर, अंगणवाडी सेविका वर्षा साठे, संगीता कविश्वर, सुरेखा वाघ, तुकाराम शेळके, भास्कर चिने, किरण शेळके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.