कांदाभाव वाढीने कोडमडले गृहिणींचे बजेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 10:54 PM2019-11-07T22:54:39+5:302019-11-07T22:57:22+5:30
देवळा : कांद्याच्या वाढलेल्या बाजारभावामुळे शहरी भागातील गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले, अशा आशयाच्या विविध माध्यमातून प्रसिद्ध होत असलेल्या वार्तांमुळे ग्रामीण भागात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
देवळा : कांद्याच्या वाढलेल्या बाजारभावामुळे शहरी भागातील गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले, अशा आशयाच्या विविध माध्यमातून प्रसिद्ध होत असलेल्या वार्तांमुळे ग्रामीण भागात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. हॉटेलिंग, मल्टिप्लेक्स, चैनीच्या वस्तू, पेट्रोल, डिझेल आदींच्या भाववाढीवर चकार शब्द न बोलणाºया शहरी नागरिकांचे नेमके कांद्याचे भाव वाढल्यावरच आर्थिक बजेट कसे कोलमडते, असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. सोशल मीडियावर याबाबत विविध प्रतिक्रि या दिल्या जात असून, शेतकºयांच्या भावना समजून घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गतवर्षी दुष्काळामुळे सर्वत्र तीव्र पाणीटंचाई होती. पावसाला उशीर झाल्यामुळे खरीप पिकांच्या लागवडीला उशीर झाला.
यामुळे रब्बी हंगामातील उन्हाळी कांदा लागवडीलादेखील उशीर होऊन कांदा पिकाला अंतिम टप्प्यात पाणी देताना पाणीटंचाई निर्माण होऊन पाण्याअभावी हातातोंडाशी आलेला कांदा अनेक शेतकºयांना सोडून द्यावा लागला व शेतकºयांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. मजूर टंचाईमुळे शेतातून कांदा वेळेवर काढला गेला नाही.
मात्र, जेव्हा कांद्याला थोडाफार भाव मिळतो तेव्हा शहरातील गृहिणींचे बजेट कांद्यानेच का कोलमडते, असा सवाल शेतकºयांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारत शेतकºयांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहनदेखील केले आहे.गतवर्षी कांदा लागवडीसाठी व काढण्यासाठी मजूर मिळत नसल्याने परवडत नसतानादेखील नाइलाजाने इतर तालुक्यांतून मजूर आणावे लागल्यामुळे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला. मजुरीचे पैसे देण्यासाठी कांद्याचे दर कोसळलेले असताना तोटा खाऊन अनेक शेतकºयांना कांदे विकावे लागले होते.