सीमा हिरे यांच्या बनावट पत्राने विश्रामगृहाचे बुकिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:46 AM2018-10-31T00:46:53+5:302018-10-31T00:47:23+5:30

विद्यमान भाजपा आमदार सीमा हिरे यांच्या नावे बनावट पत्र तयार करून एका चित्रपट निर्मात्याने मंगळवारी (दि़ ३०) शासकीय विश्रामगृहावर मुला-मुलींचे आॅडिशन घेतल्याचा प्रकार समोर आला आहे़ यामुळे शासकीय विश्रामगृहाचा दुरुपयोग समोर आला असून, विश्रामगृहात अशा कार्यक्रमांना बंदी असतानादेखील आमदारांच्या नावावर विश्रामगृह बुक करून आॅडिशन घेतल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळा गोंधळ समोर आला आहे.

 Housing booking | सीमा हिरे यांच्या बनावट पत्राने विश्रामगृहाचे बुकिंग

सीमा हिरे यांच्या बनावट पत्राने विश्रामगृहाचे बुकिंग

Next

नाशिक : विद्यमान भाजपा आमदारसीमा हिरे यांच्या नावे बनावट पत्र तयार करून एका चित्रपट निर्मात्याने मंगळवारी (दि़ ३०) शासकीय विश्रामगृहावर मुला-मुलींचे आॅडिशन घेतल्याचा प्रकार समोर आला आहे़ यामुळे शासकीय विश्रामगृहाचा दुरुपयोग समोर आला असून, विश्रामगृहात अशा कार्यक्रमांना बंदी असतानादेखील आमदारांच्या नावावर विश्रामगृह बुक करून आॅडिशन घेतल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळा गोंधळ समोर आला आहे.
हा प्रकार माध्यमांच्या लक्षात आल्यानंतर संबंधित चित्रपट निर्मात्याने आॅडिशन बंद करून काढता पाय घेतला़ दरम्यान, संबंधित चित्रपट निर्मात्याकडील पत्र आपण दिलेले नसून कोणीतरी बनावट पत्र तयार केल्याचा खुलासा आमदार हिरे यांनी केला आहे़  विश्रामगृहावर मंगळवारी मुला-मुलींचे आॅडिशन सुरू होते़ यासाठी आमदार हिरे यांच्या पत्रावर विश्रामगृहातील दोन रूम बुक करण्यात आल्या होत्या़ या पत्रावर हिरे यांचे सहायक संदीप गांगुर्डे यांचा उल्लेख करून त्यांच्या संमतीने या रूम्स देण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला होता़ विशेष म्हणजे या कार्यक्रमाचा फलकही विश्रामगृहाबाहेर लावलेला होता़ यासाठी सुमारे दीडशे मुले-मुली दाखल झाल्याने याठिकाणी मोठी गर्दी झाली होती़ या प्रकाराची माहिती माध्यमांना मिळताच त्यांनी व्हिडीओ शूटिंग सुरू केले व घाबरलेल्या आयोजकांनी आपला गाशा गुंडाळला़ बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना याची माहितीदेखील नव्हती़

Web Title:  Housing booking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.