नव्या नियमावलीने घरबांधणी महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 12:27 AM2017-09-09T00:27:38+5:302017-09-09T00:28:00+5:30

राज्य शासनाने बांधकाम क्षेत्रातील स्ट्रक्चरल डिझाइन करीत असताना वापरण्यात आलेल्या आयएस कोडमध्ये बदल केले असून, त्यामुळे घरबांधणीसाठी साधारणत: प्रति चौरस फुटासाठीचा खर्च ७५ ते १२५ रुपयांनी वाढणार आहेत.

Housing is expensive by the new rules | नव्या नियमावलीने घरबांधणी महाग

नव्या नियमावलीने घरबांधणी महाग

googlenewsNext

नाशिक : राज्य शासनाने बांधकाम क्षेत्रातील स्ट्रक्चरल डिझाइन करीत असताना वापरण्यात आलेल्या आयएस कोडमध्ये बदल केले असून, त्यामुळे घरबांधणीसाठी साधारणत: प्रति चौरस फुटासाठीचा खर्च ७५ ते १२५ रुपयांनी वाढणार आहेत. नव्या नियमांची माहिती देण्यासाठी येत्या ९ सप्टेंबर रोजी असोसिएशन आॅफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअरिंंगच्या वतीने कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
संघटनेचे नाशिक शाखेचे अध्यक्ष पुनीत रॉय तसेच अन्य पदाधिकाºयांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बांधकामांचा दर्जा आणि सुरक्षितता यादृष्टीने आयएस कोडचे महत्त्व असते. २००० मध्ये भूज येथे भूकंप झाल्यानंतर आणि आता २०१६ मध्ये त्यात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. याशिवाय १३ सप्टेंबर रोजी अभियंता दिन संस्था साजरा करणार असून, यावेळी हरिभाऊ जाधव यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी प्रसन्ना भोरे, अनिल कडभाणे, महेंद्र शिरसाठ, हर्षल भामरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Housing is expensive by the new rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.