घरकुल योजना; बांधकामाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 12:24 AM2019-12-01T00:24:31+5:302019-12-01T00:29:02+5:30

चांदवड : येथील नगर परिषदेसाठी जिल्हा समाज कल्याण विभागाकडून रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत २१ घरकुल मंजूर असून, घर बांधण्यासाठी प्रत्येक लाभार्थीस २.५० लाख रुपये देण्यात येणार असून, मंजूर सर्व लाभार्थींना घरकुल बांधकाम करण्याचे आदेश वाटप करण्यात आले आहे.

Housing scheme; Construction order | घरकुल योजना; बांधकामाचे आदेश

चांदवड नगर परिषद कार्यालयात रमाई घरकुल लाभार्थींना मंजुरी पत्राचे वाटप करताना मुख्य अधिकारी अभिजित कदम, नगरसेवक व बांधकाम सभापती अल्ताफ तांबोळी, संदीप उगले, वर्धमान पांडे, शेषराव चौधरी, राहुल हांडगे, नितीन फंगाळ आदी.

Next
ठळक मुद्देलाभार्थींना आदेश वाटप करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदवड : येथील नगर परिषदेसाठी जिल्हा समाज कल्याण विभागाकडून रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत २१ घरकुल मंजूर असून, घर बांधण्यासाठी प्रत्येक लाभार्थीस २.५० लाख रुपये देण्यात येणार असून, मंजूर सर्व लाभार्थींना घरकुल बांधकाम करण्याचे आदेश वाटप करण्यात आले आहे.
बुधवारी नगर परिषदेत आयोजित कार्यक्रमात आदेश वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी नगर परिषदेचे बांधकाम सभापती अल्ताफ राजमोहमद तांबोळी होते. त्यांच्या हस्ते लाभार्थींना आदेश वाटप करण्यात आले.
याप्रसंगी मुख्य अधिकारी अभिजित कदम, नगर परिषदेचे अभियंता शेषराव चौधरी, संदीप उगले, वर्धमान पांडे, राहुल हांडगे, नितीन फंगाळ, हर्षदा राजपूत, पवन कस्तुरे, जिशान खान, आकाश शिंदे, अमोल आहेर, सत्यवान गायकवाड, संजय गुरव, पांडुरंग भडांगे, देवीदास बनकर, अरु ण बनकर, सुंदर बनकर, प्रवीण भडांगे, केदू जगताप, संतोष भडांगे, रेखा पगारे, विजय साळवे, सचिन बनकर, देवीदास जाधव, शिवाजी जगताप, परशराम जाधव, विश्वास आहिरे, संदीप बनकर उपस्थित होते.

Web Title: Housing scheme; Construction order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.