घरातल्या सत्यनारायणावर बहिष्कार कसा?

By admin | Published: June 28, 2015 01:29 AM2015-06-28T01:29:56+5:302015-06-28T01:30:18+5:30

घरातल्या सत्यनारायणावर बहिष्कार कसा?

How to boycott Satyanarayan? | घरातल्या सत्यनारायणावर बहिष्कार कसा?

घरातल्या सत्यनारायणावर बहिष्कार कसा?

Next

  नाशिक : कुंभमेळा हा साधू-महंतांचा उत्सव आहे. तेव्हा काही जणांकडून बहिष्काराची भाषा केली जात असली तरी घरातल्या सत्यनारायणावर बहिष्कार कसा, असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराज महंतांना उद्देशून केला. नाराज झालेल्यांची समजूत पालकमंत्री काढतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पायाभूत आणि तात्पुरत्या स्वरूपाची कामे सुरू आहेत. तथापि, ही कामे कुठे आणि कशी करावी, याबाबत साधू-महंत वेळोवेळी नाराजी व्यक्त करीत असतात. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक शहरात येऊन कुंभमेळा पूर्वतयारीची आढावा बैठक घेणार असताना सकाळी त्र्यंबकेश्वर येथे आखाडा परिषदेचे हरिगिरी महाराज यांनी शासनावर तोफ डागली. शासन हे आखाड्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करीत असून, त्यामुळे १४ जुलै रोजी ध्वजारोहणानंतर आंध्र प्रदेशात जाऊन गोदावरी नदीत स्नान करू, असा इशारा त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी कुंभमेळा हा साधू-संत, महात्म्यांचा असतो. त्यांना सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे काम असते. त्यानुसार काम सुरू असून, साधू-महंतांच्या सहकार्यानेच तो यशस्वी होऊ शकतो. आपल्या घरात सत्यनारायण असताना त्यावर कोणी बहिष्कार घालते का? असा प्रश्न करून आमचे (पालक)मंत्री महंतांची नाराजी दूर करतील, असेही ते म्हणाले. दरम्यान, फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी तयारीचे सादरीकरण केले. पोलीस आयुक्त जगन्नाथन आणि महापालिका आयुक्तडॉ. प्रवीणकुमार गेडाम यांनी विविध अडचणी सांगितल्या. अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. तत्पूर्वी त्यांनी साधुग्राम, रामकुंड आणि गोदाघाटांची पाहणीही केली.

Web Title: How to boycott Satyanarayan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.