पॉलिटेक्निक, फार्मसीचा अभ्यासक्रम पूर्ण कसा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:14 AM2021-02-14T04:14:39+5:302021-02-14T04:14:39+5:30
नाशिक :राज्यातील अभियांत्रिकी, फार्मसी या व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळाने पॉलिटेक्निक व फार्मसी डिप्लोमा ...
नाशिक :राज्यातील अभियांत्रिकी, फार्मसी या व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळाने पॉलिटेक्निक व फार्मसी डिप्लोमा परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर केले आहे, त्यामुळे उर्वरित कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करणार कसा असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांनाही पडला आहे.
कोरोना काळात विद्यार्थांचे ऑनलाईन शिक्षण सुरू होते. परंतु दहावीनंतरच्या पॉलिटेक्निक व फार्मसी डिप्लोमाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना काही विषय हे प्रात्यक्षिक स्वरुपाचे असल्याने अशाप्रकारच्या अभ्यासक्रमाच्या तासिका मात्र ऑनलाईन होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारचा प्रात्यक्षिक अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्यासोबतच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करण्याचे आव्हान प्राध्यापकांसमोर निर्माण झाले आहे. त्यामुळे प्राध्यपकांना कोरोनाकाळातील शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी ५० टक्के वाढीव तासिका घ्याव्या लागणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळाला अभ्यासक्रमातही काही प्रमाणात कपात करावी लागणार आहे. त्यासाठी मंडळाची तयारी असली तरी कोणता अभ्यासक्रम किती प्रमाणात कमी होणार याविषयी अद्याप कोणतीही स्प्ष्टता नसल्याने विद्यार्थी व प्राध्यापकांसमोर परीक्षेची तयारी पूर्ण करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
पॉईंटर
नाशिक विभाग दहावीनंतर प्रथम वर्ष डिप्लोमा स्थिती
पॉलिटेक्निक कॉलेज - ८१
एकूण जागा - २३,३०७
प्रवेशित विद्यार्थी - ११,५४२
फार्मसी कॉलेज - १०३
एकूण जागा - ६४८९
प्रवेशित विद्यार्थी - ६,४००
प्राचार्य काय म्हणतात...
कोट- १
विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू असताना त्यांचे प्रात्यक्षिक अभ्यासक्रम मात्र होऊ शकलेले नाही. त्यामुळे प्रत्यक्ष महाविद्यलये सुरु झाल्यानंतर प्रथम प्रात्यक्षिक शिक्षणावर भर देण्यात येणार असून विद्यार्थांकडून परीक्षेपूर्वी प्रात्याक्षिक करून घेतले जाणार आहे.
- डॉ. अविनाश दरेकर प्राचार्य, केव्हीएन नाईक फार्मसी महाविद्यालय.
कोट-२
कोरोनामुळे प्रभावित झालेले शैक्षणिक वर्षातील नुकसान भरून काढण्यासाठी तंत्रनिकेतन महाविद्यलयांकडून ५० टक्के अधिक तासिका घेण्यात येणार असून त्यामुळे परीक्षा वेळेत घेता येतील. त्याचा पुढील शैक्षणिक वर्ष नियमित कालावधीत सुरू करणे शक्य होईल.
- प्रकाश कडवे, प्राचार्य, के. के. वाघ पॉलिटेक्निक
विद्यार्थी काय म्हणतात...
कोट -
कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण सुरू असताना अनेक विषयांमधील क्लिष्ट संकल्पाना स्पष्ट होऊ शकलेल्या नाही. त्याचप्रमाणे प्रात्यक्षिक विषयांचे वर्गही होऊ शकले नाही. त्यामुळे उर्वरीत कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षेची तयारी करताना कसरत करावी लागणार आहे.
- विशाल जाधव, पॉलिटेक्निक विद्यार्थी,
कोट-२
ऑनलाईन अभ्यासक्रमात प्रात्यक्षिक झालेले नाही. त्यामुळे परीक्षा देण्यात निश्चितच अडचणींचा सामना करावा लागणार आहे. विशेषत: प्रात्यक्षिक परीक्षांची तयारी परीक्षेपूर्वी होणे अवाश्यक असून त्यासाठी महाविद्यलयांनी अधिक तासिकांचे नियोजन करणे आवश्यक आहे.
- तेजस कदम, फार्मसी डिप्लोमा विद्यार्थी