लॉकडाऊन केले तर छोट्या व्यावसायिकांनी जगायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:16 AM2021-04-01T04:16:12+5:302021-04-01T04:16:12+5:30

निवेदनात म्हटले आहे? की, आपल्याला लोकांना जगवायचे आहे? की, मारायचे आहे, कोरोना ही न संपणारी प्रक्रिया आहे. आज ...

How do small businesses survive if locked down? | लॉकडाऊन केले तर छोट्या व्यावसायिकांनी जगायचे कसे?

लॉकडाऊन केले तर छोट्या व्यावसायिकांनी जगायचे कसे?

Next

निवेदनात म्हटले आहे? की, आपल्याला लोकांना जगवायचे आहे? की, मारायचे आहे, कोरोना ही न संपणारी प्रक्रिया आहे. आज निगेटिव्ह आलेली व्यक्ती उद्या पॉझिटिव्ह येऊ शकते मग आयुष्यभर लॉकडाऊन करणार का? एक वर्षापासून सर्व छोटे व्यवसाय बंद आहेत. त्यांनी जगायचे कसे? त्यांच्या जगण्याची अगोदर सोय करा आणि नंतरच लॉकडाऊन करा. जे चार-दोन टक्के लोक लॉकडाऊन पाहिजेच असे म्हणणारे आहेत, ते सरकारी कर्मचारी आहेत. सर्वात अगोदर यांचा पगार बंद करा म्हणजे त्यांना समजेल लॉकडाऊन काय असतो. हातावर पोट असणाऱ्या व्यक्तीला संध्याकाळच्या जेवणाची चिंता असते तो कसा जगणार? आम्ही तुमच्याकडे कोणतीच मागणी करीत नाही तर आमचे काम सुरू करण्याची मागणी करीत आहोत.

पुणे, मुंबई, नागपूर येथे दिवसाला सरासरी पाच हजार बाधित मिळत आहेत तरी लॉकडाऊन नाही. मग नंदुरबारमध्ये काय गरज आहे. काही दिवसांनी कोरोना हा सामान्य आजार म्हणून जाहीर केला जाऊ शकतो, तोपर्यंत अनेक कुटुंबे उद‌्ध्वस्त झालेली असतील. नियम कितीही कठोर असू द्या लोकं त्याचे पालन करतील; पण लॉकडाऊन मुळीच नको, असेही निवेदनाच्या शेवटी सुराणा यांनी म्हटले आहे.

Web Title: How do small businesses survive if locked down?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.