पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा कसा घालविणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:14 AM2021-05-13T04:14:17+5:302021-05-13T04:14:17+5:30

मन:शांती, मनाची स्थिरता राखण्यासाठी आपण करीत असलेल्या कर्तव्यातून आपल्या स्वत:साठी निश्चितच निदान पाच मिनिटांचा वेळ तरी काढणे क्रमप्राप्त ठरते. ...

How to get rid of mental fatigue of police and health workers? | पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा कसा घालविणार?

पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा कसा घालविणार?

googlenewsNext

मन:शांती, मनाची स्थिरता राखण्यासाठी आपण करीत असलेल्या कर्तव्यातून आपल्या स्वत:साठी निश्चितच निदान पाच मिनिटांचा वेळ तरी काढणे क्रमप्राप्त ठरते. कामाचा वाढलेला बोजा यामुळे वेळच मिळत नाही, हे कारण किमान स्वत:ला तरी सांगणे टाळायला हवे, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांकडून देण्यात येतो. आपल्या एखाद्या अवयवांवर डोळे मिटून एकाग्रचित्त होण्याचा जरी प्रयत्न निदान पाच मिनिटे आहे, त्या ठिकाणी केला तरी मन हलके होण्यास मदत होते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

कोरोनाच्या साथीमुळे गेल्या वर्षभरापासून पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. अशा स्थितीत जर समाज या ‘फ्रन्टलाईन’वर काम करणाऱ्या घटकांना ‘योद्धा’ असे संबोधू लागला आहे, तर यापेक्षा अधिक मोठी बाब काय असू शकते? असा सकारात्मक जरी विचार या दोन्ही पेशांमधील कर्मचाऱ्यांनी केला तरीदेखील मनाचा थकवा नाहीसा होण्यास खूप मोठी मदत होईल आणि सकारात्मक ऊर्जा शरीराला मनातून मिळेल, असेही मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मृणाल भारद्वाज यांनी सांगितले.

----कोट---

कुटुंब अन‌् नोकरी सांभाळण्याची कसरत

---

१) कोरोनामुळे नक्कीच कामाचा व्याप वाढला आहे; मात्र आमच्या शहर पोलीस दलाचे प्रमुख म्हणून धुरा सांभाळणारे सीपीसाहेब स्वत: मानसिक-शारीरिक आरोग्याबाबत जागरूक असल्याने कामाचे ओझे जरी असले तरी मानसिक थकवा फारसा जाणवत नाही. नाकाबंदीच्या फिक्स पॉइंटवर आम्हाला वेळोवेळी पिण्यासाठी स्वच्छ पाणी आणि उन्हाळ्यामुळे बर्फ, किंवा फ्रीजचे पाणी पिण्याची वेळ येऊ नये, यासाठी थेट मातीचे माठदेखील पुरविण्यात आले आहेत. यामुळे आपली कोणीतरी काळजी करणारा आहे या विचाराने मनातून आपोआप काम करण्याची सकारात्मक ऊर्जा शरीराला मिळत जाते.

- एक पोलीस.

--

२) कोरोनामुळे कधी आठ, तर कधी बारा तास ड्युटी देण्याची वेळ आली आहे. नाकाबंदी, गस्तीत वाढ झाली आहे. स्वत:चे आरोग्य सांभाळून आपल्या कुटुंबीयांचे आरोग्यही सुरक्षित ठेवण्याचे आव्हान आहे. अशा स्थितीत मात्र कोरोनाकाळात कर्तव्य बजावताना आयुक्तालयाकडून ज्या पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा विचार केला जात आहे, तो यापूर्वी कधीही अनुभवयास आला नाही. वेळोवेळी बंदोबस्ताच्या ठिकाणी नाश्ता, एनर्जी ड्रींक, पिण्याचे मुबलक पाणी, उकाड्यापासून बचावासाठी चक्क कुलर नाकाबंदीच्या तंबूत उपलब्ध होण्याचा तर मला पहिलाच अनुभव इतक्या वर्षात आला. यामुळे मानसिक दडपण वाटत नाही.

- एक पोलीस

----

१) कोरानामुळे कामाचा ताण खूपच वाढला आहे. आरोग्य सेवा देताना दमछाक तर होत आहे, कारण अपुरे मनुष्यबळ आणि त्या तुलनेत वाढती रुग्णसंख्या याचे समीकरणच जुळत नाही. यामुळे कामाची वेळ खूपच वाढलेली आहे. अशा स्थितीत स्वत:चे आरोग्य राखण्याचे मोठे आव्हान आहे, कारण आपल्यामुळे आपले कुटुंबदेखील बाधित होण्याची चिंता मनात सतत असते.

-आरोग्यसेवक

---

२) रुग्णसेवेचा पेशा आम्ही स्वीकारला असल्याने रुग्णांना बरे करण्यासाठी जिवाचे रान करीत आहोत. समाजाकडूनही आदर, सन्मानाच्या भावनेतून आमच्याकडे बघितले जात असल्याने मनाला नक्कीच मोठा आधार मिळतो; मात्र रुग्णालयीन व्यवस्था आणि एका कर्मचाऱ्याच्या आरोग्याबाबत प्रशासनाकडून घेतली जाणारी जबाबदारीचा जेव्हा विचार मनात येतो, तेव्हा कुठेतरी मन खजील होते.

- आरोग्य कर्मचारी

------कोट----

मनात नकारात्मक विचार येणारच नाही, असे होऊच शकत नाही. मात्र, सद्य:स्थिती आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटना आणि वातावरणामुळे याचे प्रमाण अधिक वाढत आहे. पोलीस, आरोग्य कर्मचारी यांच्यावर सध्या कामाचा मोठा ताण आणि जबाबदाऱ्यांमध्ये झालेली वाढ यामुळे मनाचा थकवा येणे स्वभाविक आहे. त्यामुळे भूतकाळ, भविष्यकाळ न आठवता वर्तमान स्थितीवर फोकस करीत स्वत:च्या मनाला वर्तमानात जगविण्याचा प्रयत्न करावा. ध्यानधारणेसाठी वेळ द्यावा, म्हणजे एक तास किंवा अर्धा तास काढायचा कसा? असे नाही, तर किमान पाच ते दहा मिनिटे एकाग्रचित्त राहण्याचा प्रयत्न नक्कीच करायला हवा. मन-शरीराचा जवळचा संबंध आहे, हे विसरून चालणार नाही. सभोवताली सगळेच नकारात्मक घडत आहे, असे नाही तर सकारात्मक घडणाऱ्या गोष्टींकडेही लक्ष देत रात्रीचा दिवस होतोच असा विचाराने नेहमी स्वत:ला आशावादी ठेवा.

- डॉ. मृणाल भारद्वाज, मानसोपचार तज्ज्ञ

--

---कोट---

पोलिसांवर मानसिक थकवा येऊ नये, यासाठी सर्वतोपरी खबरदारी आयुक्तालयाकडून घेतली जात आहे. नाकाबंदीच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या माठापासून, तर तंबू, खुर्ची, वॉटर एअर कुलरपर्यंत आवश्यक वस्तू पुरविल्या आहेत. यामुळे बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढण्यास नक्कीच मदत होते. मानसिक खच्चीकरण होऊ नये, यासाठी पुरेपूर दक्षता घेत कर्मचाऱ्यांना बंदोबस्ताच्या ठिकाणी वेळोवेळी नाश्ता, एनर्जी ड्रिंक्स, फळेदेखील पुरविली जात आहेत. कोविड केअर सेंटरसोबत कोर्मोबिटी सेंटरदेखील मुख्यालयात कार्यान्वित करण्यात आले आहे. त्याचाही फायदा पोलीस कर्मचारीवर्गाला होत आहे.

-दीपक पाण्डेय, पाेलीस आयु्क्त

----

आकडेवारी

आरोग्य कर्मचारी २७,९७८

डॉक्टर्स- ९२७६

-

पोलीस कर्मचारी- ६२२१

पोलीस अधिकारी- ४८५

---

डमी आहे नोंद घ्यावी

Web Title: How to get rid of mental fatigue of police and health workers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.