कसा देणार संगणकीय सातबारा उतारा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 01:05 AM2017-08-12T01:05:35+5:302017-08-12T01:05:40+5:30
गेल्या बारा वर्षांपासून सुरू असलेले संगणकीय सातबारा उताºयाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नसून, राज्य सरकारने स्वातंत्र्य दिनापासून आॅनलाइन प्रणालीने १५ आॅगस्टच्या मुहूर्तावर संगणकीय सातबारा उतारा खातेदारांना देण्याचे जाहीर केलेले असले तरी, राज्यातील सुमारे ३६ हजार गावांतील सातबारा उताºयातील चुका अद्याप दुरुस्त करणे बाकी असल्याचे अलीकडे केलेल्या पाहणीतून स्पष्ट झाल्याने शासनाच्या घोषणेने यंत्रणा हवालदिल झाली आहे.
नाशिक : गेल्या बारा वर्षांपासून सुरू असलेले संगणकीय सातबारा उताºयाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नसून, राज्य सरकारने स्वातंत्र्य दिनापासून आॅनलाइन प्रणालीने १५ आॅगस्टच्या मुहूर्तावर संगणकीय सातबारा उतारा खातेदारांना देण्याचे जाहीर केलेले असले तरी, राज्यातील सुमारे ३६ हजार गावांतील सातबारा उताºयातील चुका अद्याप दुरुस्त करणे बाकी असल्याचे अलीकडे केलेल्या पाहणीतून स्पष्ट झाल्याने शासनाच्या घोषणेने यंत्रणा हवालदिल झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी राज्याचे महसूल सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी संगणकीय सातबारा उताºयाच्या कामकाजाचा आढावा घेतला असता त्यात ही बाब उघड झाली. शासनाने यापूर्वी १ मे महाराष्टÑ दिनापासून संगणकीय सातबारा उतारा देण्याचे जाहीर केले होते, परंतु सॉफ्टवेअर व सर्व्हरच्या त्रासामुळे तलाठी, मंडळ अधिकाºयांना मुदतीत काम पूर्ण करणे शक्य झाले नाही. म्हणून शासनाने १५ आॅगस्टचा मुहूर्त मुकर्रर केला. महसूल सचिवांनी घेतलेल्या आढाव्यातदेखील वारंवार डाउन होणाºया सर्व्हरचा प्रश्न राज्यातील विभागाीय आयुक्तांनी उपस्थित करून यातील अडचणी सोडविण्याची मागणी केली. या अडचणींची महसूल सचिवांनीदेखील त्याच्याशी सहमती दर्शविली, मात्र आता शासनाने घोषणाच केलेली असल्यामुळे १५ आॅगस्टपर्यंत प्रत्येक जिल्ह्णात किमान दोनशे गावांचे सातबारे तरी संगणकीय बिनचूक असावेत, अशा सूचना केल्या आहेत.
प्रातिनिधिक वाटप?
स्वातंत्र्य दिनापासून संगणकीय सातबारा उताºयांच्या वाटपाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र अद्याप अनेक गावांमधील काम बाकी आहे. यामुळे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण समारोहानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते फक्त प्रातिनिधिक स्वरूपात संगणकीय सातबारा उताºयाचे वाटप करून मुहूर्त साधला जाणार असल्याचे समजले आहे.
राज्यात ४३ हजार ९४३ गावे असून, यंत्रणेने तयार केलेले संगणकीय सातबारांचे गावोगावी चावडी वाचन करण्यात येऊन हस्तलिखित सातबारा व संगणकीय सातबारा यांच्यातील चुका शोधण्यात आल्या. या चुकांची दुरुस्ती करण्यासाठी ‘रि-एडिट’ मॉड्यूल सॉफ्टवेअर तयार करण्यात आले. परंतु या सॉफ्टवेअरमध्ये काम करताना शासनाचे सर्व्हर वेळोवेळी डाउन होत असून, स्पीड मिळत नसल्याचे तलाठ्यांचे म्हणणे आहे.
गेल्या काही दिवसांत फक्त ७७४५ गावांचे सातबारा उतारे बिनचूक होऊ शकले म्हणजे आॅनलाइन प्रणालीने ते देण्यास हरकत नाही; मात्र शासनाने मागेल त्याला संगणकीय सातबारा उतारा देण्याचे जाहीर केले असून, ३६ हजार गावांमध्ये बिनचूक उताºयाचे काम झालेलेच नसल्याने यंत्रणा हवालदिल झाली आहे.