विशेष रेल्वेच्या नावाखाली प्रवाशांची लूट आणखी किती दिवस चालणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:17 AM2021-07-14T04:17:59+5:302021-07-14T04:17:59+5:30
----- नाशिकमार्गे धावतात ८० रेल्वे सध्याच्या मितीला नाशिकरोड रेल्वे स्थानक मार्गे ८० रेल्वे अप डाऊन मार्गे धावत आहे. --------------- ...
-----
नाशिकमार्गे धावतात ८० रेल्वे
सध्याच्या मितीला नाशिकरोड रेल्वे स्थानक मार्गे ८० रेल्वे अप डाऊन मार्गे धावत आहे.
---------------
आरक्षणाची सक्ती बंद करायला हवी
* कोरोनाच्या पहिल्या चार महिन्यानंतर रेल्वे प्रशासनाने कोविड स्पेशल रेल्वे सुरू केल्या. या रेल्वेंना पूर्वीप्रमाणेच प्रवासी भाडे आकारणी करण्यात आली आहे. मात्र आरक्षण व कन्फर्म तिकीट सक्तीचे करण्यात आले आहे.
* सर्वसाधारण तिकीट रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेंना जादा दर आकारणी करण्यात आली आहे. फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेंना तत्काळच्या दराने प्रवासी भाडे आकारणी केली आहे.
---------
तिकिटात फरक किती?
* सर्वसाधारण तिकिटासाठी दहा रुपये, स्लीपर कोचसाठी शंभर रुपये व वातानुकूलित डब्यातील प्रवासासाठी चारशे रुपये जादा दर आकारणी करण्यात आली आहे.
------------
प्रवाशी म्हणतात....
कोरोनाचे नाव पुढे करून व राज्य शासन परवानगी देत नसल्याचे सांगत रेल्वे प्रशासन पॅसेंजर दर्जाच्या गाड्या सुरू करत नसल्याने रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे पैसे जादा प्रमाणात खर्च होतात व वेळ देखील मोठ्या प्रमाणात वाया जातो. पॅसेंजर दर्जाच्या गाड्या सुरू केल्यास रेल्वेच्या उत्पन्नात भर पडेल.
- राजेश फोकणे, रेल्वे सल्लागार समिती सदस्य
--------------
रेल्वेने आता सर्व गाड्या सुरू करून पूर्वीप्रमाणेच प्रवासी भाडे आकारणी केली पाहिजे. कोरोनाच्या नावाखाली विनाकारण आरक्षण व कन्फर्म तिकीट कंपल्सरी केले आहे. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक लूट केली जात आहे. रेल्वेचे उत्पन्न वाढविण्यासाठी पूर्वीप्रमाणेच प्रवासी भाडे दर आकारणी करून सर्वसाधारण तिकीट चालू करणे गरजेचे आहे.
-संजय गायकवाड, प्रवासी