किती ही लूट? बाजार समितीत वांगी ३० रुपये, तर घराजवळ ६० रुपये किलो !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:14 AM2021-08-01T04:14:33+5:302021-08-01T04:14:33+5:30
चौकट- १) हा बघा दरांमधील फरक (प्रतिकिलो दर) भाजीपाला ...
चौकट-
१) हा बघा दरांमधील फरक (प्रतिकिलो दर)
भाजीपाला बाजार समिती घराजवळ
मेथी जुडी १५ ३०
शेपू १०-१५
कांदा पात १५ ३०
कोथिंबीर १५ ४०
वांगी २० ६०
टमाटा १५ २०
कोबी १० २०
फ्लाॅवर १० २०
कांदा १५ २५
भेंडी ३० ६०
बटाटा १० २०
दोडका २५ ६०
चौकट-
बाजार समितीत कोबी १० रुपये, नाशिकरोड परिसरात २० रुपये नग
भाजीपाल्याचे दर परिसरानुरूप बदलत गेल्याचेही दिसते. बाजार समिती आवारात भाजी विकणाऱ्यांकडून कोबी, फ्लॉवरचा एक नग दहा रुपयांना मिळतो तर तोच नग नाशिकरोड, सिडको परिसरात २० रुपयांना घ्यावा लागतो. गंगापूररोड, कॉलेजरोड परिसरातही दर वेगवेगळे असल्याचे दिसून येत आहे. बाजार समिती लांब असल्याने तिकडे जाणे होत नसल्याने अनेक नागरिक अधिकचे पैसे मोजून घराजवळच भाजीपाला खरेदी करत असतात.
चौकट-
पिकवतात शेतकरी, जास्तीचा पैसा तिसऱ्याच्याच हातात !
कोणताही विक्रेता भाजीपाला काही स्वत:च्या घरात पिकवत नाही. तो शेतकऱ्यांकडूनच भाजीपाल्याची खरेदी करून किरकोळ स्वरूपात ग्राहकांना विकत असतो. यामुळे प्रत्यक्ष भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाती फार काही पडत नाही. ग्राहकांना २० रुपयांना मिळणाऱ्या कोबी, फ्लॉवरचे शेतकऱ्याला फार तर ५-८ रुपये मिळत असतात. यामुळे कष्टकरणाऱ्या शेतकऱ्यांना कमी भावातच आपला माल द्यावा लागतो.
चौकट-
एवढा फरक कसा?
कोट-
बाजार समितीत भाजीपाला विक्री करणारे तिथल्या तिथे व्यवहार करत असतात. शेतकऱ्यांकडून ठोक स्वरूपात घेऊन लगेचच ते किरकोळ स्वरूपात विक्री करण्यास सुरुवात करतात. इतर बाजारांमध्ये माल विक्री करणाऱ्यांना मात्र वाहतूक खर्च आणि इतरही खर्च करावा लागतो यामुळे तेथील आणि स्थानिक बाजारांमध्ये दरांचा फरक जाणवत असतो.
- अनिल पुणे, भाजीविक्रेता
कोट-
अनेकवेळा बाजार समितीत बदला माल विकला जातो. प्रत्येक मालाची प्रतवारी वेगवेगळी असते. प्रतवारीनुसारही मालाचे दर ठरत असतात. याशिवाय तेथे माल किलोने विकला जातो. आम्ही आतपाव, पावशेरावर व्यवसाय करत असतो. वाहतुकीबरोबरच भाजीपाला सांभाळण्याची जोखीमही आम्हाला स्वीकारावी लागते. कुणीही दोन पैसे मिळविण्यासाठीच कष्ट करत असतो.
- दिलीप गायधनी, भाजीविक्रेता
चौकट-
अर्धा-पाव किलोसाठी होलसेल बाजारात जाणे परवडत नाही !
कोट-
आम्ही काही आठवडाभराचा भाजीपाला खरेदी करत नाही. राेज लागणारी भाजी रोज घेतो त्यामुळे थेट पंचवटीत जाऊन भाजीपाला खरेदी करणे परवडणारे नाही. शिवाय तिकडे अधिक प्रमाणात भाज्या घ्याव्या लागतात. दारजावळच्या विक्रेत्याकडून पावशेर अर्धा किलो खरेदी केले तरी चालते- मनीषा वाघ, गृहिणी
कोट-
घरासाठी रोज लागणारी भाजी दारावर येणाऱ्या भाजीविक्रेत्याकडून घेणेच परवडते. आपल्याला हव्या त्या भाज्यांची निवड करून आपल्याला लागणाऱ्या प्रमाणातच खरेदी केली अगदी पावशेर मागितली तरी तो विक्रेता देत असतो यामुळे त्याच्याकडे घेणे परवडते. जाण्यायेण्यासाठी लागणारा खर्च वाचतो.
- रूपाली खैरनार, गृहिणी