महापालिकेचे क्षेत्रफळ नेमके किती?

By admin | Published: February 5, 2015 12:04 AM2015-02-05T00:04:43+5:302015-02-05T00:11:40+5:30

विकास आराखडाकार संभ्रमात : उपमहापौरांच्या पहिल्याच चेंडूवर भुक्तेंची उडाली दांडी

How much of the municipal area? | महापालिकेचे क्षेत्रफळ नेमके किती?

महापालिकेचे क्षेत्रफळ नेमके किती?

Next

नाशिक : नव्याने तयार होणाऱ्या शहर विकास आराखड्यावर चर्चा करण्यासाठी आराखडाकार उपसंचालक प्रकाश भुक्ते यांनी महापालिकेत बैठक बोलावली खरी; परंतु बैठकीच्या प्रारंभी उपमहापौरांनी टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर भुक्तेंची दांडी उडाली. उपमहापौरांचा प्रश्न होता, ‘महापालिकेचे क्षेत्रफळ २५९.१२ चौरस किलोमीटर असताना आराखडा तयार करण्यासाठी २८२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ कसे धरले गेले?’ त्यावर भुक्ते यांनी दोन्हीही क्षेत्रफळांबाबत आपल्याला निश्चित खात्री नसल्याचे सांगत त्याविषयी शासनाकडून कोणत्याही मार्गदर्शक सूचना नसल्याचा बॉम्बगोळा टाकला. यावेळी उपमहापौरांनी क्षेत्रफळच निश्चित नाही, तर त्या विकास आराखड्याला काय अर्थ, असा सवाल उपस्थित करत आराखड्याच्या भवितव्याबद्दलच चिंता व्यक्त केली.

Web Title: How much of the municipal area?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.