बुंधे आवळल्याने झाडे कशी वाचतील?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:11 AM2021-06-17T04:11:34+5:302021-06-17T04:11:34+5:30
नाशिक शहरातील हिरवळ हळूहळू नष्ट होत चालली आहे. रस्ता रुंदीकरणाच्या वेळी रस्त्यालगतच झाडे तोडण्यास पर्यावरणप्रेमींनी विरोध सुरू केला की, ...
नाशिक शहरातील हिरवळ हळूहळू नष्ट होत चालली आहे. रस्ता रुंदीकरणाच्या वेळी रस्त्यालगतच झाडे तोडण्यास पर्यावरणप्रेमींनी विरोध सुरू केला की, महापलिकेच्यावतीने झाडे तोडली जाणार नाहीत, असे सांगितले जाते परंतु नंतर झाडांच्या बुंध्याभाेवतीच डांबरीकरण किंवा ाकाँक्रीटीकरण केले जाते. त्यामुळे या झाडांना मुळाकडून पाणी किंवा पोषण होत नाही. परिणामी ही झाडे फार टिकत नाही.
यापूर्वी महापालिकेने असा प्रयत्न केल्यानंतर शहरातील वृक्षप्रेमींनी आंदाेलन करून हा मुद्दा न्यायालयात नेला होता. त्यानंतर न्यायालयाने वृक्षप्रेमींच्या बाजूने कौल दिला असला तरी त्याची अंमलबाजवणी होत नाही म्हणून स्वत: वृक्षप्रेमींनीच झाडांचे बुंधे मोकळे करण्याचे काम केले. यासंदर्भात, महापालिकेने झाडे वाचविण्याचे आश्वासन दिले असले तरी झाडे टिकणार नाही याचीच जणू व्यवस्था केलेली दिसते. मुळाच महापालिकेत उद्यान विभाग आणि बांधकाम विभाग यांच्यात कोणताही समन्वय नाही. त्यामुळे रस्ते तयार करताना एकतर झाडे तोडली जातात किंवा तोडली नाही तरी ती वाचणार नाही याची पूरेपूर काळजी घेतली जाते की काय, अशी व्यवस्था केली जाते. आताही महापालिकेच्या वतीने बारा हजार रोपे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, दुसरीकडे लावलेल्या झाडांवर अशाप्रकारे गंडांतर आणले जात असेल तर उपयोग काय, असा प्रश्न केला जात आहे.
कोट...
२०१४ मध्ये नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही महापालिकेकडून किंवा अन्य शासकीय कार्यालयांकडून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयास अन्य शासकीय कार्यालयांना निवेदने देण्यात आली आहेत. त्यामुळे अनेकदा पर्यावरणप्रेमींनी झाडांचे बुंधे मोकळे केले आहेत.
- निशिकांत पगारे, वृक्षप्रेमी, नाशिक (छायाचित्र आर फोटोवर १६ निशिकांत पगारे)
-----
छायाचित्र क्रमांक १६पीएचजेयु १७१ शरणपूररोड, १६पीएचजेयु- कॉलेज रोड