तरीही एसटी प्रवासालाच प्रवाशांचे अधिक प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:14 AM2021-07-28T04:14:54+5:302021-07-28T04:14:54+5:30
--इन्फो-- एसटीला स्पीड लॉक; ट्रॅव्हल्स सुसाट नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला स्पीड लॉक असल्याने प्रवाशांची सुरक्षितता अधिक आहे. ...
--इन्फो--
एसटीला स्पीड लॉक; ट्रॅव्हल्स सुसाट
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला स्पीड लॉक असल्याने प्रवाशांची सुरक्षितता अधिक आहे. प्रवाशांच्या जिवाचा प्रश्न असल्याने बस सुसाट चालवू नये यासाठी गाड्यांना स्पीड लॉक देण्यात आलेला आहे. खासगी बसेसला मात्र स्पीड लॉक केलेला असेलच असे सांगता येत नाही.
--इन्फो--
जिल्ह्यातील अपघात
२०१८ : २०८/१२
२०१९ : २१९/०८
२०२० : ८८/०२
२०२१ : २९/०९
जुलै :
--कोट --
प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य
राज्य परिवहन महामंडळात प्रवाशांच्या सुरक्षिततेला जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे एस.टी. महामंडळाचा प्रवास अधिक सुरक्षित मानला जातो. चालकांची विनाअपघात सेवा, त्यांच्यावर असलेली जबाबदारी, प्रसंगी कारवाई तसेच स्पॉट चेकिंगही होत असल्याने चालक-वाहकांना नियमानुसारच सेवा बजावावी लागते. खासगी बसेसच्या बाबतीत अशी जबाबदारी असेलच असे नाही. चालक निर्व्यसनी आहे का? हाही मोठा प्रश्न असतो.
--कोट--
आराम महत्त्वाचा की सुरक्षितता
बसची सुरक्षितता असली तरी लांबचा प्रवास करावयाचा असल्यास खासगी बसच आरामदायी वाटते. आरामदायक प्रवास होणेदेखील तितकेच महत्त्वाचे असते. खासगी ट्रॅव्हल्सकडून ही सेवा दिली जाते. बस सुस्थितीत असल्याने प्रवास छान होतो.
- राहुल जकातदार, प्रवासी
नाशिक ते पुणे असा अनेकदा प्रवास करावा लागतो. परंतु, त्यासाठी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणेच अधिक सुरक्षित वाटते. खासगी बस बंदिस्त असल्याने सुरक्षित वाटत नाही. महामंडळाची निमआराम बस पुणे प्रवासासाठी चांगलीच आहे. खासगी आणि महामंडळाच्या बसला तेवढाच वेळ लागतो.
- धनंजय कुटे, प्रवासी