सीटी स्कॅनमुळे कोरोनाची तीव्रता शोधणे शक्य : डॉ. मंगेश थेटे
By संजय पाठक | Published: May 6, 2021 03:20 PM2021-05-06T15:20:42+5:302021-05-06T15:26:21+5:30
नाशिक- कोरोना संसर्ग झाल्यानंतर संबंधीत रूग्णांना किती तीव्र लक्षणे आहेत हे तपासण्यासाठी सीटी स्कॅन उपयुक्त ठरत आहेत. सीटी स्कॅन केल्यामुळे रेडीएशनचा धोका असतो ही आता कालबाह्य बाब झाली आहे. नवीन सीटी स्कॅन मशिन्स अत्यंत सुरक्षीत आहेत, असे स्पष्टीकरण इंडीयन मेडीकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि विभागीय संदर्भ सेवा रूग्णालयाचे सीटी स्कॅन विभागाचे प्रमुख डॉ. मंगेश थेटे यांनी केले.
नाशिक- कोरोना संसर्ग झाल्यानंतर संबंधीत रूग्णांना किती तीव्र लक्षणे आहेत हे तपासण्यासाठी सीटी स्कॅन उपयुक्त ठरत आहेत. सीटी स्कॅन केल्यामुळे रेडीएशनचा धोका असतो ही आता कालबाह्य बाब झाली आहे. नवीन सीटी स्कॅन मशिन्स अत्यंत सुरक्षीत आहेत, असे स्पष्टीकरण इंडीयन मेडीकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि विभागीय संदर्भ सेवा रूग्णालयाचे सीटी स्कॅन विभागाचे प्रमुख डॉ. मंगेश थेटे यांनी केले.
सध्या कोरोनाा बाधीत रूग्णांना रूग्णालयात दाखल करायचे असल्याचे रूग्णाचा एचआरसीटी स्कोर किती ते तपासूनच रूग्णांना दाखल केले जाते. मात्र, सीटी स्कॅनच्या रेडीएशनमुळे कर्करोगाचा धोका असतो काही तज्ज्ञांचे मत आहे. त्याबाबत मते मतांतरे आहेत. परंतू डॉ. थेटे यांनी मात्र अशाप्रकारे दुष्परीणाम होत नसल्याचे सांगितले.
प्रश्न- सध्या सीटी स्कॅन विषयी खूपच संभ्रमाचे वातावरण आहे. सीटी स्कॅन करावा का?
डॉ. थेटे- सीटी स्कॅन हे आवश्यकच असते. विशेषत: सध्या कोरोना संसर्गाचा काळ आहे. ए्खाद्याला संसर्ग झालाच, तर त्याची तीव्रता किती हे त्यातून कळत असते. एचआरसीटी स्कॅनींगमध्ये कळणाऱ्या स्कॅनमुळे त्या रूग्णाबाबत अचूक निदान तर होतेच शिवाय त्याला रूग्णालयात दाखल करायचे की घरीच उपचार करता येणे शक्य आहे, ही उपचाराची दिशा देखील ठरवता येते. त्यामुळे सध्या तर सीटी स्कॅन अधिक उपयुक्त आहे.
प्रश्न- सीटी स्कॅन मशिनमुळे आरोग्यावर दुष्परीणाम होतात हे खरे आहे का?
डॉ. थेटे- पूर्वीच्या काळातील सीटी स्कॅन मशिन्स् आणि आत्ताची मशिन्स यात खूप फरक आहे. अगदी सुरूवातीच्या काळातील मशिन्स मुळे होणारे रेडीएशन आता होत नाही. किंबहूना ते खूपच नगण्य असते. आता लोडोस मशिन्स असल्याने त्यातून रेडीएशन घातक प्रमाणात होत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे सीटी स्कॅन मशिन्स एफडीने मान्यता दिलेले आहेत. जर ती आरोग्यासाठी घातक असती तर शासनाच्या अन्न आणि औषध प्रशासनाने त्याल मंजुरीच दिली नसती. त्यामुळे आरोग्याला खूप घातक ठरेल अशी अवस्था नाही.
प्रश्न- पण कोरोना संसर्ग झाला म्हणजे सीटी स्कॅन केलेच पाहिजे असे आहे काय?
डॉ. थेटे- सध्या नाशिक मध्ये शासकीय रूग्णालय, नाशिक महापालिकेचे रूग्णालय आणि सुमारे वीस खासगी स्कॅनींग सेंटर्स याठिकाणी स्कॅनींग केले जाते. जर सीटी स्कॅन धोकादायक असते तर शासकीय आणि नमि शासकीय रूग्णालयात देखील सीटी स्कॅन होऊ शकले नसते. अर्थात कोरोना बाधीताने वैद्यकीय सल्ल्याने स्कॅनींग करणे योग्य ठरेल.