ऋतीका आव्हाड हिची कुस्ती स्पर्धेत राज्यस्तरावर निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 06:24 PM2019-10-14T18:24:46+5:302019-10-14T18:26:06+5:30
भगूर येथील बलकवडे व्यायाम शाळेत पार पडलेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत येथील लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयाची खेळाडू कुस्तीपटू ऋतीका ज्ञानेश्वर आव्हाड हिने उल्लेखणीय कामगिरी करुन राज्यपातळीवर धडक मारली आहे.
सिन्नर : भगूर येथील बलकवडे व्यायाम शाळेत पार पडलेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत येथील लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयाची
खेळाडू कुस्तीपटू ऋतीका ज्ञानेश्वर आव्हाड हिने उल्लेखणीय कामगिरी करुन राज्यपातळीवर धडक मारली आहे.
इयत्ता दहावीच्या या विद्यार्थिनी ५५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळविला. आळंदी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. या यशाबद्दल
सिन्नर तालुका संचालक हेमंत वाजे, शालेय समिती अध्यक्ष कृष्णाजी
भगत, शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कहांडळ, उपमुख्याध्यापक बाळासाहेब शिंदे, पर्यवेक्षिका डी डी जाधव, बाजीराव नवले
यांच्याहस्ते तीचा सत्कार करण्यात आला. क्रीडा शिक्षक ज्ञानदेव
नवले, वसंत शिंदे, हेमलता वाघ, विजय धोंडगे यांचे मार्गदर्शन लाभले.