हुदलीकर यांच्या ‘डोह माझा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 12:56 AM2018-04-02T00:56:17+5:302018-04-02T00:56:17+5:30
नाशिक : संतोष हुदलीकर यांच्या ‘डोह माझा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन परशुराम साईखेडकर नाट्यगृहात रविवारी (दि.१) करण्यात आले.
नाशिक : संतोष हुदलीकर यांच्या ‘डोह माझा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन परशुराम साईखेडकर नाट्यगृहात रविवारी (दि.१) करण्यात आले. शाहीर नंदेश उमप यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी प्राचार्य अविराज तायडे, प्राचार्य मकरंद हिंगणे, गीतकार संजय गिते, रागिणी कामतीकर, मीना निकम, संतोष हुदलीकर, चैत्रा हुदलीकर आदी उपस्थित होते. नंदेश उमप यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संतोष हुदलीकर हे मातीशी नाते असलेले कवी असल्याचे सांगितले. तर जोपासायचा राहून गेलेला संगीताच्या छंदाच्या आठवणींचे मनात साचलेले शब्दरूपी डोह या काव्यसंग्रहच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केल्याचे कवी संतोष हुदलीकर यांनी सांगितले. दरम्यान, प्रकाशित काव्यसंग्रहातील निवडक कवितांचे संतोष हुदलीकर व संजय गिते यांनी केलेल्या सुरेल गायनाने उपस्थितांची मने जिंकली. सूत्रसंचालन संजय चौधरी यांनी केले. मनीषा क्षेमकल्यानी यांनी आभार मानले.