झोपडीत घुसून बिबट्याचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 02:04 PM2019-03-29T14:04:09+5:302019-03-29T14:04:26+5:30
सर्वतिर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथील चैनी फाटा परिसरातील तारीचा मोढा या वाडीतील ग्रामस्थ नंदू त्र्यंबक घाणे यांच्या शेतावरील झोपडीत शिरकाव करत धुमाकूळ घातला.
सर्वतिर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथील चैनी फाटा परिसरातील तारीचा मोढा या वाडीतील ग्रामस्थ नंदू त्र्यंबक घाणे यांच्या शेतावरील झोपडीत शिरकाव करत धुमाकूळ घातला. मात्र वनविभागाने वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान या झोपडीत नंदू त्र्यंबक घाणे यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्य या राहत होते.बिबट्या झोपडीत शिरला ही माहिती वनपरिमंडळ अधिकारी जी.आर.जाधव यांना कळताच त्यांनी आपल्या सर्व वनरक्षक,वनमजुर यांच्या टीम सह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. कुठलेही शासकीय सरंक्षण सामग्री नसतांना देखील त्यांनी रात्रीच्या अंधारात आपला जीव धोक्यात घालून बॅटरीच्या साहाय्याने नंदू त्र्यंबक घाणे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सर्वांना झोपडीतून सुखरूप बाहेर काढले व झोपडीत ठाण मांडून बसलेल्या बिबट्याला पळवून लावले.यावेळी घटनास्थळी अधरवडचे सरपंच ज्ञानेश्वर डमाळे, पोलिस पाटील मनीषा बºहे, व उपस्थित ग्रामस्थांनी आदींनी वनविभागाच्या सर्व टीमचे व जाधव यांचे आभार मानले. दरम्यान, या बिबट्याला लवकरच पिंजरा लावून रेस्क्यू करण्यात येईल असेही जाधव यांनी ग्रामस्थांना सांगितले.