लासलगांव मध्ये गुंडांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 06:32 PM2018-12-27T18:32:47+5:302018-12-27T19:07:37+5:30

लासलगांव : अवैध धंद्या च्या सूळसुळाटी नंतर लासलगाव मध्ये गँगवारने डोके वर काढले असून भर चौकत तलवारी आण िकोयते घेवून दहशत माजवत आहे यामुळे सर्व सामान्य नागरिक मध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.रात्रीच्या वेळी आता घराबाहेर पडने मुश्किल झाल्याचे नागरिक बोलत आहे. येथील शिवाजी चौकात बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास काही गुंडांनी चौकात शिवीगाळ करत कोयते आण ितलवार काढत दहशत माजवन्याचा प्रकार घडला.

 Hugging hooligans in Lasgaon | लासलगांव मध्ये गुंडांचा हैदोस

लासलगांव मध्ये गुंडांचा हैदोस

Next
ठळक मुद्देशिवाजी चौकामध्ये तलवारी, कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रकार

लासलगांव : अवैध धंद्या च्या सूळसुळाटी नंतर लासलगाव मध्ये गँगवारने डोके वर काढले असून भर चौकत तलवारी आण िकोयते घेवून दहशत माजवत आहे यामुळे सर्व सामान्य नागरिक मध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.रात्रीच्या वेळी आता घराबाहेर पडने मुश्किल झाल्याचे नागरिक बोलत आहे. येथील शिवाजी चौकात बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास काही गुंडांनी चौकात शिवीगाळ करत कोयते आण ितलवार काढत दहशत माजवन्याचा प्रकार घडला.
लासलगाव व परिसरात या घटनेमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी ही येथील बाजार तळामध्ये अशा अनेकदा घटना घडल्या आहे. सायकंळ च्या वेळी बाजार तळामधून महिलांना जाणे मुश्कील झाले आहे. याच रस्त्यांमधून शाळा-कॉलेजमध्ये मुला-मुलींचा जाण्याचा मार्ग असल्याने पोलिस प्रशासनाने यामध्ये लक्ष देण्याची मागणी येथील नागरिक करीत आहेत.
लासलगाव येथील बाजारतळात जानेवारी 2017 मध्ये सायंकाळी साडे पाच वाजेदरम्यान काही अज्ञात इसमाणी विंचुर येथील एका शेतकरी हे आपल्या चारचाकी गाडीने जात असताना परिसरातील गुंडानी त्याचे एकञ येत तेथे ऊभ्या असलेल्या चार चाकी वाहनांची तोडफोड करु ण गाडीची काच फोडत दहशत निर्माण केली होती.
पुन्हा गँगवार......
लासलगाव व परीसरात या टोळीपासुन अनेकांना ञास होत आहे आता तर त्यांनी वाहनांची मोडतोड करण्याचा धडाका लावुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. याआधीही 1 फेब्रूवारी 2016 रोजी अशाच प्रकारे अनेक वाहनांची मोडतोड केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर जानेवारी 2017 मध्ये असाच प्रकार घडला होता .लासलगाव मध्ये त्यांच्या वाढत चाललेल्या कारवाया पाहता पोलीसांनी कठोर पावले उचलण्याची मागणी सर्वसामान्य नागरीक करीत आहेत.
 त्रस्त महिला
येथील बाजारतळामध्ये सायंकाळच्या वेळेस दारु ड्यांची इतकी गर्दी असते की येथून महिलांना जाणे-येणे सुद्धा मुश्किल झाले आहे.त्यात खुलेआम तलवारी कोणते काढून दहशत माजवन्याचे प्रकार सुरू आहे.यूपी बिहार सारखे प्रकार गावात घडू लागल्याने परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण आहे.

Web Title:  Hugging hooligans in Lasgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.