आॅक्सिजन सिलिंडरची हुल्क बॉटल फुटली परिचारिका जखमी
By admin | Published: October 17, 2016 12:47 AM2016-10-17T00:47:44+5:302016-10-17T01:00:42+5:30
जिल्हा रुग्णालय : अतिदक्षता विभागातील घटना
नाशिक : आॅक्सिजन सिलिंडरला जोडलेल्या पाइपला जोडलेली हुल्क बोटल दबाव वाढल्याने फुटल्याची घटना रविवारी (दि़१६) सकाळी जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात घडली़ या घटनेमध्ये अतिदक्षता विभागातील परिचारिका विद्या आंबेकर यांच्या हाताला मार लागला असून, त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत़ तर या विभागातील रुग्ण तसेच नातेवाइकांमध्ये घबराट पसरली होती़ दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ सुरेश जगदाळे यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत़
अतिदक्षता विभागातील रुग्णांसाठी कृत्रिम श्वासोच्छ्वासाची गरज असून, त्यासाठी आॅक्सिजन सिलिंडरचा वापर केला जातो़ जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सकाळी सात वाजेच्या सुमारास आॅक्सिजन सिलिंडरच्या पाईपमध्ये अचानक दबाव वाढल्याने हुल्क बॉटल फुटली़
यावेळी जवळच असलेल्या परिचारिका आंबेकर यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली़ या घटनेची माहिती परिचारिकांनी वरिष्ठांना दिल्यानंतर त्यांनी आॅक्सिजन सिलिंडर तसेच वातानुकूलन यंत्रणा बंद करण्यास सांगितले़ (प्रतिनिधी)