महागाईविरोधात दिंडोरीत मानवी साखळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 01:31 PM2018-10-25T13:31:00+5:302018-10-25T13:31:09+5:30
दिंडोरी : वाढती महागाई व वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात माकपाच्यावतीने मानवी साखळी करून अनोखे आंदोलन करण्यात आले. माकपाचे जिल्हा सेक्रटरी ...
दिंडोरी : वाढती महागाई व वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात माकपाच्यावतीने मानवी साखळी करून अनोखे आंदोलन करण्यात आले. माकपाचे जिल्हा सेक्रटरी सुनील मालसुरे, इंद्रजित गावित, रमेश चौधरी, सुवर्णा गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी तहसील कार्यालय येथून मानवी साखळीस सुरु वात करण्यात आली. सुमारे दोन किलोमीटर पर्यंत मानवी साखळी तयार करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी,लक्ष्मीबाई काळे, आप्पा वाटाणे, योगेश अहिरे, पंकज अस्वले, प्रशांत जाधव, सोमनाथ सुरासे आदींसह नागरिक उपस्थित होते.
----------------------------
अशा आहेत मागण्या
केंद्र व राज्य सरकारने नोकरभरतीवर घातलेली बंदी उठवावी, वाढत्या महागाईला आळा घालावा,
वनहक्क कायद्याच्या सर्व तरतुदींची अमलबजावणी करावी, सर्व शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे, खाजगी शाळेतील फी वाढीवर निर्बंध आणावे.
-------------------------------
शिक्षण क्षेत्रात सुरु असलेली लुट थांबली पाहिजे, सरकारी नोकर्यांमध्ये असलेला अनुशेष भरून काढला पाहिजे. हे सरकार फक्त आश्वासने देत आहे,मात्र मागण्या पूर्ण करण्यास अपयेशी ठरले आहे, जनतेचा संयम सरकारने पाहू नये.
-सुनील मालुसुरे, जिल्हा सेक्र ेटरी, माकप