शहा विद्यालयात विद्यार्थ्यांची मानवी साखळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 10:51 PM2020-01-01T22:51:17+5:302020-01-01T22:53:05+5:30
सिन्नर तालुक्यातील भैरवनाथ हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालय शहा येथील विद्यार्थ्यांनी सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत केले.
पाथरे : सिन्नर तालुक्यातील भैरवनाथ हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालय शहा येथील विद्यार्थ्यांनी सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत केले.
विद्यार्थ्यांनी अनोख्या मानवी साखळीद्वारे स्वागत २०२० ही मराठी अक्षरे मैदानावर तयार करून नववर्ष अभिनंदन केले. या मानवी साखळीमध्ये जवळपास २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. मैदानावर आखीव-रेखीव पद्धतीने विद्यार्थ्यांनी केलेल्या कवायतीमुळे अक्षरांना वळण व आकर्षकता निर्माण झाली. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सरत्या वर्षाला निरोप दिला. नवीन वर्षात यशस्वी होण्यासाठी, एकमेकांमधील ऋणानुबंध वाढावे आणि मैत्रीपूर्ण संबंध कायम टिकावे यासाठी संकल्प केला. प्राचार्य सुनील गडाख यांनी विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पर्यवेक्षक संजय जाधव, शमीरु ल्ला जहागीरदार, नारायण वाघ, सलीम चौधरी, रमेश रांैदळ, बाळासाहेब खुळे, जगदीश बडगुजर, रवींद्र कोकटे, बाळासाहेब कुमावत, राजेंद्र गवळी, नवनाथ पाटील, नितीन जगताप, अलका कोतवाल, मंगला बोरणारे, सुमती मेढे, बरखा साळी, मेधा शुक्ल, विश्वनाथ ठोक, सुरेखा गुरु ळे, सचिन रानडे, रवींद्र डावरे, सुनील तासकर, जगन शिंदे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.