संविधान जागर समितीतर्फे मानवी साखळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 10:31 PM2020-01-30T22:31:32+5:302020-01-31T00:56:39+5:30
सीएए, एनआरसी, एनपीए कायदा राज्य घटना विरोधी असून, या कायद्यात केलेल्या सुधारणा मागे घ्याव्यात या मागणीसाठी येथील संविधान जागर समितीतर्फे गुरुवारी मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.
मालेगाव : सीएए, एनआरसी, एनपीए कायदा राज्य घटना विरोधी असून, या कायद्यात केलेल्या सुधारणा मागे घ्याव्यात या मागणीसाठी येथील संविधान जागर समितीतर्फे गुरुवारी मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशात संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना हिणवून, देशद्रोशी, धर्मद्रोही ठरविले जात आहे. आंदोलने दाबली जात आहेत. सरकारची मनमानी सुरू आहे. मानवी हक्क व संविधानाच्या संरक्षणासाठी झटू, असा संदेश देण्यासाठी संविधान जागर समितीने पक्षविरहित व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शहरातील महात्मा गांधी पुतळा ते अपर जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान मानवी साखळी तयार केली होती. यावेळी अपर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
मानवी साखळी समितीचे निमंत्रक राजेंद्र भोसले, माजी महापौर रशीद शेख, सुभाष परदेशी, दिनेश ठाकरे, अनिल पाटील, अजय शहा, भारत चव्हाण, प्रा. के. एन. अहिरे, आर. डी. निकम, धर्मा भामरे, प्रा. विजय शेवाळे, महेश शेरेकर, अनिल महाजन, भारत म्हसदे, चंद्रशेखर देवरे, संजय वाघ, भारत जगताप, जे. एस. वाघ, सागर पाटील, बिपीन बच्छाव, गौतम अहिरे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.