२० पासून मानवी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 01:16 AM2018-08-06T01:16:47+5:302018-08-06T01:16:54+5:30

नाशिक : महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष विचारवंत प्रा. डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि डाव्या चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित संघटनांबद्दल राज्य सरकारला माहिती असूनही राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने तपास कामात दिरंगाई करण्यात येऊन दोषी व्यक्ती व संघटनांवर कारवाई करण्यात टाळटाळ करण्यात येत आहे. याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी तसेच सामाजिक बहिष्कार विरोध कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यभरात दि. २० आॅगस्ट ते २१ सप्टेंबर या काळात मानवी विकास संवाद प्रबोधन अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली.

Human dialogue from 20 | २० पासून मानवी संवाद

२० पासून मानवी संवाद

Next
ठळक मुद्देप्रबोधन अभियानपानसरे, दाभोळकर, कलबुर्गी हत्येप्रकरणी तपासात दिरंगाईचा अंनिसकडून आरोप

नाशिक : महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष विचारवंत प्रा. डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि डाव्या चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित संघटनांबद्दल राज्य सरकारला माहिती असूनही राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने तपास कामात दिरंगाई करण्यात येऊन दोषी व्यक्ती व संघटनांवर कारवाई करण्यात टाळटाळ करण्यात येत आहे. याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी तसेच सामाजिक बहिष्कार विरोध कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यभरात दि. २० आॅगस्ट ते २१ सप्टेंबर या काळात मानवी विकास संवाद प्रबोधन अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली.
वसंतराव नाईक तंत्रशिक्षण संस्थेत अंनिसच्या वतीने सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा प्रशिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी सदर माहिती दिली. यावेळी पाटील म्हणाले की, अंधश्रद्धा निर्मूलन संबंधीची चळवळ आणखी व्यापक करण्याची गरज आहे. कारण संभाजी भिडे यांच्यासारखे लोक आंबा खाऊन पुत्रप्राप्ती होते, असे लोकांना सांगून दिशाभूल करतात तेव्हा त्यांच्याविरुद्ध केवळ गुन्हा दाखल करून थांबणे योग्य नाही. तर त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी बोगस डॉक्टर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा. त्याचप्रमाणे या प्रकरणी तपास करण्यासाठी सरकारी वकील अ‍ॅड. उदय वारुंजीकर यांची नेमणूक करावी अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली.
दाभोळकर व पानसरे हत्या प्रकरणात आपण यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचीदेखील वेळोवेळी भेट घेतली तरीही तपासाला गती मिळाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, अंनिसच्या स्थापनेला तीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ९ आॅगस्ट २०१८ ते २० पर्यंत वर्षभर विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली. याप्रसंगी कृष्णा चांदगुडे, महेंद्र दातरंगे, प्रभाकर धात्रक आदींसह अंनिसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Human dialogue from 20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.