मनुष्य जीवन म्हणजेच कर्तव्य, साधू ग्यानवत्सलदास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:15 AM2021-03-25T04:15:26+5:302021-03-25T04:15:26+5:30

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरच्या नाशिक शाखेच्या ४८ वा वर्धापनानिमित्त महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष पद्मश्री बाबुभाई राठी ...

Human life is a duty, Sadhu Gyanvatsaldas | मनुष्य जीवन म्हणजेच कर्तव्य, साधू ग्यानवत्सलदास

मनुष्य जीवन म्हणजेच कर्तव्य, साधू ग्यानवत्सलदास

Next

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरच्या नाशिक शाखेच्या ४८ वा वर्धापनानिमित्त महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष पद्मश्री बाबुभाई राठी स्मृती ऑनलाईन व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बेालत होते.

कामाच्या वेळेत काम करा, सामाजिक जीवनात कार्य केले पाहिजे, पारिवारिक जीवनात आनंदी राहिले पाहिजे त्यासाठी परिवाराला वेळ द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रारंभी संतोष मंडलेचा यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि गेल्या ४८ वर्षात चेंबरने व्यापारी, व्यवसायिक, उद्योजक आणि शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याला उजाळा दिला.

याप्रसंगी विश्वस्त आशिष पेडणेकर, खुशालभाई पोद्दार, वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, सुनिता फाल्गुने, मिथिला कापडणीस, सोनल दगडे, दीपाली चांडक, मृदुला जाधव, मिलिंद राजपूत, सचिव विनी दत्ता आदिंसह कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

Web Title: Human life is a duty, Sadhu Gyanvatsaldas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.