मानवता सायकल रॅलीस प्रतिसाद

By admin | Published: December 27, 2015 10:41 PM2015-12-27T22:41:13+5:302015-12-27T22:43:17+5:30

मानवता सायकल रॅलीस प्रतिसाद

Humanity cycle rally response | मानवता सायकल रॅलीस प्रतिसाद

मानवता सायकल रॅलीस प्रतिसाद

Next

इंदिरानगर : मानवता हेल्थ फाउंडेशन व नाशिक सायकलिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मानवता सायकल रॅलीस नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. यावेळी दोनशे सायकलस्वार सहभागी झाले होते.
सकाळी ६.३० वाजता जॉगिंग ट्रॅक येथील सिटी गार्डन येथे मानवता सायकल रॅलीचे अमेरिकेचे रॅम स्पर्धा विजेते डॉ. महेंद्र महाजन यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले. स्मार्ट सिटी नाशिक अंतर्गत प्रदूषणमुक्त नाशिक हरित नाशिकसाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
सायकल रॅलीची सुरुवात सिटी गार्डन येथून करण्यात येऊन साईनाथनगर चौफुली, सावरकर चौक, राजे छत्रपती चौक, वडाळा-पाथर्डी रस्ता, पाथर्डी चौफुली, वडनेर गेट येथून परत सिटी गार्डन घेण्यात आली. रॅली दोन गटात घेण्यात आली. यामध्ये ५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी ८ कि.मी. अंतर आणि १८ वर्षांवरील सर्वांना १६ कि.मी. सायकल रॅली ठेवण्यात आली होती. प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष जसपाल सिंग बिरदी, आर. जे. भूषण, डॉ. मनीषा रौंदळ उपस्थित होते.
रॅली यशस्वी होण्यासाठी मानवता हेल्थ फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र दुसाने, उपाध्यक्ष जयंत ठोंबरे, धिरज छाजेड, शशिकांत बोरसे, सतीश लोहारकर, साधना दुसाने, तेजल भोसले, भाग्यश्री शिवडेकर यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Humanity cycle rally response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.