परदेशात असलेल्या लासलगावकरांनी जोपासली माणुसकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 11:16 PM2020-04-07T23:16:22+5:302020-04-07T23:16:37+5:30
कोरोनाच्या संकटात थेट अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या दोघा लासलगावकरांनी मदतीचा हात पुढे करीत माणुसकी जोपासली आहे.
लासलगाव : कोरोनाच्या संकटात थेट अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या दोघा लासलगावकरांनी मदतीचा हात पुढे करीत माणुसकी जोपासली आहे.
योगेश कासट सध्या अमेरिकेत (कॅलिफोर्निया), तर दीपक प्रकाश बिडवई कॅनडात आहेत. कोरोनामुळे आपल्या मातृभूमीशी नाळ कायम ठेवीत योगेश कासटने नाशिक जिल्ह्यात पेठ तालुक्यातील दुर्गम भागातील कुटुंबांना १५ दिवस पुरेल एवढ्या संसारोपयोगी वस्तंूसाठी अमेरिकेतून ५ लाख रुपयांची मदत पाठविली आहे. दीपक बिडवई यांनी लासलगावचे सामाजिक कार्यकर्ते संजय बिरार यांना फोन करून त्यांच्याकडे लहानपणी घरी धुणी-भांडी करणाऱ्या शांताबाई कुºहाडे सध्या लासलगावमधे कुठे राहतात याची विचारणा करीत त्यांना मदतीची गरज असेल ती मी पाठवितो. त्यांच्यापर्यंत पोहोचवा, असे सांगितले. ही बाब बिरार यांनी नीलेश देसाई व पिंटू लिलानी यांना कळविली. त्यांनी शांताबाई कुºहाडे यांचा पत्ता व घर शोधले व लासलगाव येथे लोकसहभागातून गोळा करण्यात येणाºया जीवनापयोगी वस्तू त्यांच्या घरी पोहोचविल्या. ही माहिती समजताच दीपक बिडवई यांनी तहसीलदार दीपक पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार उपसरपंच जयदत्त होळकर यांनी सुरू केलेल्या कोरोना सहायता निधीस पंचवीस हजार रुपये पाठविले. यावेळी उपसरपंच, जयदत्त होळकर ,संतोष ब्रह्मेचा, गुणवंत होळकर, डॉ. विकास चांदर, नीलेश देसाई लासलगावचे ग्रामविकास अधिकारी शरद पाटील व संजय बिरार उपस्थित होते.
कोरडा शिधा वाटप
लासलगाव : निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांच्या आवाहनाला साद देत लासलगाव येथील जयदत्त होळकर मित्रमंडळाच्या वतीने ग्रामपंचायतीच्या सहकार्याने शहरातील दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून सुमारे २७० गरजू कुटुंबांना कोरड्या शिध्याचे वाटप केले. तहसीलदार दीपक पाटील यांनी लासलगाव येथे उपसरपंच जयदत्त होळकर यांची भेट घेऊन गरजूंना मदतीसाठी आवाहन केले. त्यानुसार येथील जयदत्त होळकर मित्रमंडळ व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने शहरातील दानशूर व्यक्तींना किराणा संकलित करण्याचे आवाहन केले होते. ग्रामविकास अधिकारी शरद पाटील, माजी उपसरपंच संतोष ब्रह्मेचा, गुणवंत होळकर, दिनेश जाधव, मयूर बोरा, डॉ. विकास चांदर, प्रिन्स भल्ला, पिंटू शिकलकर, महेश होळकर, संजय जाधव आदी उपस्थित होते.