सय्यद कुटुंबीयांच्या माणुसकीने दिले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:14 AM2021-05-22T04:14:17+5:302021-05-22T04:14:17+5:30

----- नाशिक : डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या आवारात घडलेल्या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेत भय्या सय्यद यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मुलांनी ...

The humanity of the Syed family gave life | सय्यद कुटुंबीयांच्या माणुसकीने दिले जीवदान

सय्यद कुटुंबीयांच्या माणुसकीने दिले जीवदान

Next

-----

नाशिक : डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या आवारात घडलेल्या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेत भय्या सय्यद यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मुलांनी धावपळ करत ऑक्सिजनचे सिलिंडर आणलेही मात्र तोपर्यंत उशीर झाला होता आणि त्यांचे पितृछत्र कायमचे हरपले. जवळच्या खाटेवर ऑक्सिजनअभावी श्वास गुदमरत असलेल्या महिलेला त्यांनी ते सिलिंडर दिले. डॉक्टरांनी ताबडतोब त्या महिलेला या सिलिंडरद्वारे ऑक्सिजन देण्यास सुरुवात केली आणि तिला जीवदान लाभले.

मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात महिनाभरापूर्वी अचानकपणे ऑक्सिजन टाकीला गळती लागली अन‌् अनर्थ घडला होता. यावेळी सय्यद यांची दोन्ही मुले नदीम व साहील तसेच त्यांचे मित्र मुस्तकीम कुरेशी, ताबीश सय्यद, मोईन शेख, सकलेन शेख, इरफान कुरेशी यांनीही दुचाकींनी धावाधाव करीत दोन सिलिंडर तत्काळ रुग्णालयात आणले. भय्या सांडूभाई सय्यद (५९, रा. रॉयल कॉलनी, पखाल रोड) यांना ऑक्सिजन लावला. हे दोन्ही सिलिंडर निम्मेच असल्यामुळे ते लवकर संपणार म्हणून तरुण पुन्हा सातपूर औद्योगिक वसाहतीकडे धावले. तेथून रुग्णालयात पोहोचेपर्यंत उशीर झाला होता आणि ऑक्सिजनचा दाब कमी होत गेल्याने सय्यद यांचा श्वास कायमचा थांबला. ‘लोकमत’कडे आपल्या भावना व्यक्त करताना त्यांच्या दोन्ही मुलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. औद्योगिक वसाहतीमधून आणलेल्या ऑक्सिजन सिलिंडरने मात्र त्या कक्षात उपचारासाठी दाखल असलेल्या दुसऱ्या एका महिलेचे प्राण वाचू शकले.

वडिलांना गमावल्याचे दु:ख झेलत एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचे प्राण वाचाविण्यासाठी सय्यद कुटुंबातील मुलांनी दाखविलेली माणुसकी नक्कीच इतरांनाही प्रेरणा देऊन जाते. आपत्कालीन प्रसंगाच्यावेळी सर्व काही विसरून केवळ त्यावेळी मदतीचा हात देत माणुसकी धर्म बजवावा, हेच या प्रसंगातून अधोरेखित झाले.

Web Title: The humanity of the Syed family gave life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.