मनुष्याने सदैव सत्कर्म करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 01:13 AM2019-01-13T01:13:34+5:302019-01-13T01:13:52+5:30

संन्यासातून शाश्वत फलप्राप्ती होत असते. सदैव चांगले कर्म केले पाहिजे. मन, चित्त शुद्धीसाठी कर्माचे अनुष्ठान करावे व नंतर ज्ञानाच्या मार्गाचा अवलंब करावा, असे प्रतिपादन दक्षिणाम्नाय शृंगेरी शारदा पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य विधुशेखर भारती महास्वामी यांनी केले.

Humans always do good deeds | मनुष्याने सदैव सत्कर्म करावे

शंकराचार्य विधुशेखर भारती यांचा सत्कार करताना स्वामी संविदानंद सरस्वती. समवेत मान्यवर.

Next
ठळक मुद्देशंकराचार्य विधुशेखर भारती : कैलास मठात पाद्यपूजन सोहळा

पंचवटी : संन्यासातून शाश्वत फलप्राप्ती होत असते. सदैव चांगले कर्म केले पाहिजे. मन, चित्त शुद्धीसाठी कर्माचे अनुष्ठान करावे व नंतर ज्ञानाच्या मार्गाचा अवलंब करावा, असे प्रतिपादन दक्षिणाम्नाय शृंगेरी शारदा पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य विधुशेखर भारती महास्वामी यांनी केले. पेठरोडवरील कैलासनाथ भक्तिधाम येथे शनिवारी (दि.१२) सायंकाळी शृंगेरी जगद्गुरू शंकराचार्य पाद्यपूजा व दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.
शनिवारी सायंकाळी शंकराचार्यांनी कैलास मठास भेट दिली त्यावेळी शंकराचार्यांचा पाद्यपूजन सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी उपस्थित भाविकांना आशीर्वचनपर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, जगद्गुरू शंकराचार्यांनी आपल्या देशात हजारो वर्षांपूर्वी अवतार घेऊन सनातन धर्माचा उद्धार केला आहे. प्रत्येक व्यक्तीला धर्म मार्गात जाण्याची प्रेरणा दिली आहे. आश्रमात सर्वश्रेष्ठ संन्यास आश्रम आहे. शंकराचार्य नसते तर आपण वैदिक विद्या बघू शकलो नसतो. शंकराचार्यांविषयी श्रद्धेने राहायला पाहिजे. या पाद्यपूजन सोहळ्याला स्वामी रामतीर्थजी महाराज, निश्चयानंद महाराज, श्याम चैतन्य, ब्रह्मदत्त शर्मा, स्वामी अलोकानंदा, डॉ. दिनेश बच्छाव, आर. आर. पाटील, भालचंद्र शेवचे आदींसह भाविक उपस्थित होते.

Web Title: Humans always do good deeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.