पुरणगाव येथील आत्मा मालिक विद्यालयात हास्ययोग कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 06:58 PM2019-07-24T18:58:10+5:302019-07-24T18:59:59+5:30
मानोरी : येवला तालुक्यातील पुरणगाव येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीअम गुरु कुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये हास्ययोग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नाशिक जिल्हा हास्ययोग समितीच्या अध्यक्ष आदिती वाघमारे उपस्थित होत्या.
या हास्ययोग कार्यशाळेमध्ये हास्य योग विद्येचा खरा प्रारंभिक विकास विद्यार्थी जीवनात होत असतो व तोच त्यांच्या शारीरिक,मानसिक व अध्यात्मिक विकासाचा मूळ पाया आहे अशा शब्दात त्यांनी हास्ययोगाचे महत्व पटवून दिले. यावेळी गुरु कुलातील १७०० विद्यार्थ्यांंनी हास्ययोगाची विविध प्रात्यक्षिके करून वर्षभर हास्य योग करण्याचा संकल्प केला. गुरु कुलाचे अध्यक्ष हनुमंतराव भोंगळे यांनी विद्यार्थी जीवनात हास्य योगाचे महत्व काय ते पटवून सांगितले. याप्रसंगी नाशिक जिल्हा हास्ययोग समितीचे उपाध्यक्ष योग शिक्षक राजेंद्र भंडारी व दिलीप पाटील तसेच पुरणगाव संतपिठाचे संत सेवादास महाराज आदि मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमास प्राचार्य राजेश पाटील,पर्यवेक्षक तेजस राऊत,विभागप्रमुख राहुल नरोडे,कार्यालयीन अधीक्षक प्रमोद शेलार,संकुल प्रमुख प्रकाश भामरे,योगशिक्षक प्रवीण घोगरे,संगीत विभागाचे शाम शिंदे व शिक्षकवृंदाने कार्यशाळेत सहभाग घेतला. सूत्रसंचालन कविता आहेर यांनी केले.