आयएसपी रुग्णालयात शंभर खाटांचे बाल रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:14 AM2021-05-16T04:14:49+5:302021-05-16T04:14:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत मुलांना त्रास होण्याची शक्यता वर्तविली जात असून, त्या पार्श्वभूमीवर इंडिया ...
लोकमत न्यूज नेटवर्क,
नाशिक : कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत मुलांना त्रास होण्याची शक्यता वर्तविली जात असून, त्या पार्श्वभूमीवर इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या बंद रुग्णालयात शंभर खाटांचे बाल रुग्णालय सुरू करता येणे शक्य आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे, अशी सूचना महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली आहे.
यासंदर्भात महापौर सतीश कुलकर्णी यांनी पदाधिकारी व अधिकारी यांच्या शुक्रवारी (दि. १४) आयएसपी हॉस्पिटल पाहणी केली.
केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या इंडिया सेक्युरिटी प्रेस हॉस्पिटल सद्य:स्थितीत बंद आहे. रुग्णालयाची इमारत भव्य असून, मोकळी जागादेखील भरपूर असल्याने पार्किंगचीदेखील सोय आहे. कोरोनाची तिसरी संभाव्य लाट बघता इमारतीची रंगरंगोटी, डागडुजी, लिकेज, इलेक्ट्रिक, फायर, ड्रेनेज, ऑक्सिजन लाईन, आदींचे कामकाज करावे लागणार असून, हे काम येत्या दोन महिन्यांत ही कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिल्या.
या पाहणी दौऱ्यात महापौरांसह सभागृह नेते सतीश बापू सोनवणे, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, स्वीकृत सदस्य प्रशांत जाधव, माजी उपमहापौर ॲड. मनीष बस्ते, माजी सदस्य तानाजी आप्पा जायभावे, कार्यकारी अभियंता धर्माधिकारी, उपअभियंता साळी, वैद्यकीय विभागाचे नोडल ऑफिसर डॉ. पलोड यांच्यासह स्थानिक हॉस्पिटलच्या चीफ मेडिकल ऑफिसर गाडेकर व सी. डी. सुमरा, आदी उपस्थित होते.
कोट.. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन नवीन बिटको हॉस्पिटल येथेही शंभर बेडचे लहान मुलांकरिता रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ ही आता आएसपी रुग्णालयातदेखील रुग्णालय होणार असल्याने आता दोन बाल रुग्णालये सज्ज असतील.
- महापौर सतीश कुलकर्णी
-----
छायाचित्र १५ हॉस्पिटल नावाने एडीटवर फोटो ओळ...कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी करण्यासाठी इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या बंद पडलेल्या रुग्णालयाची पाहणी करताना महापौर सतीश कुलकर्णी. समवेत भा्जप शहराध्यक्ष गिरीश पालवे, तसेच सभागृह नेते सतीश सोनवणे आदी उपस्थित होते.