दशमेश दरबार गुरुद्वारामध्ये उभारला शंभर फुटी ध्वज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 12:20 AM2020-02-10T00:20:32+5:302020-02-10T00:54:18+5:30
बोरटेंभे येथील मुंंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या दशमेश दरबार गुरु द्वाराचा वर्धापन दिन व संत बाबा तारासिंगजी महाराज व संत बाबा चरणसिंगजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संत बाबा सुखाकसिंग महाराज यांच्या हस्ते शंभर फुटी निशाण साहिब ध्वजाचे अनावरण करण्यात आले.
इगतपुरी : तालुक्यातील बोरटेंभे येथील मुंंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या दशमेश दरबार गुरु द्वाराचा वर्धापन दिन व संत बाबा तारासिंगजी महाराज व संत बाबा चरणसिंगजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संत बाबा सुखाकसिंग महाराज यांच्या हस्ते शंभर फुटी निशाण साहिब ध्वजाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी आमदार हिरामण खोसकर, पहिलवान संघटनेचे अध्यक्ष तथा तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, पंचायत समितीचे माजी सभापती रामदास घारे, नगराध्यक्ष संजय इंदुलकर, उपनगराध्यक्ष नईम खान, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख कुलदीप चौधरी, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, सहायक पोलीस निरीक्षक अमोल खोंडे, मोहन रावत, विजय गुप्ता, राजेंद्र गुप्ता यांच्यासह शीख बांधव व बोरटेंभे येथील ग्रामस्थ उपस्थित
होते.
बाबा मंगलसिंग
यांचे प्रवचन
पंजाब येथील गुरु संत बाबा मंगलसिंग यांंच्या प्रवचनाचा आनंद भाविकांनी घेतला. दशमेश दरबार गुरु द्वाराचे प्रमुख बाबा सुकदेवसिंग यांनी या कार्यक्र माचे आयोजन केले होते. याप्रसंगी आलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमात पंजाब येथील आंतरराष्ट्रीय कबड्डीचे आयोजन करण्यात आले होते.