शेकडो नागरीकांनी सोशल डिस्टन्सिंगचा वाजविला बोजवारा....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 03:32 PM2020-06-21T15:32:10+5:302020-06-21T15:33:23+5:30
खेडलेझुंगे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांना गर्दी करण्यास सक्त मनाई आहे. तरीही नागरिक शासनाच्या सचारबंदीला धुडकावून मुक्त संचार करीत आहेत.
खेडलेझुंगे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांना गर्दी करण्यास सक्त मनाई आहे. तरीही नागरिक शासनाच्या सचारबंदीला धुडकावून मुक्त संचार करीत आहेत.
निफाड तालुक्यातील रु ई येथे शनिवारी आठवडे बाजार भरविण्यात येत असतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हाबाजारबंद करण्यात आलेला होता. परंतु शनिवारी(दि.२०) रु ई येथे नेहमीच्या जागेवरच भरविण्यात आला, त्यामुळे लगेच खरेदी करतांना शेकडो नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग न पाळता गर्दी केलेली होती. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर घ्यावयाची काळजी कोणत्याही नागरीकांकडुन घेतांना आढळुन आले नाही. तोंडाला मास्क किंवा रु माल न बांधता नागरीक मोठ्या संख्येने एकत्र आल्याचे दिसून येत आहे. गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासन, पदाधिकारी व संबंधित पोलीस विभागाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने जागरूक नागरिकांनी यावर रोष व्यक्त केला आहे.
रु ई येथे अचानक शनिवारी बाजार भरविला गेला कसा हा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. कोरोना कालावधीत सदरचा बाजार पाटाच्या किनारी भरविण्यात येत होता. तेथेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन होतांना दिसुन येत नव्हते असे अनेकांनी सांगितले. निफाड तालुक्यात सुमारे २१ गावांमध्ये ५१ कारोनारु ग्ण आढळुन आलेले आहेत. त्यापैकी ४ रु ग्णांचा मृत्यही झालेला आहे. याची सर्व ग्रामीण भागात माहीती असुनही येथे बाजार भरविण्यातआल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाजीपाला, किराणा, औषधी आदी वस्तू जीवनावश्यक वस्तू असल्याने नागरिकांना खरेदी करणे आवश्यक आहे, मात्र वस्तू खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंग ठेवणे तेवढेच गरजेचे आहे. नागरिक घराबाहेर न पडता दहशतीच्या वातावरणात जीवन जगत आहेत. तर दुसरीकडे कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहेत. रु ईपासुन अवघ्या ६ किमी अंरावरील खेडलेझुंगे येथे श्निवारी (दि.२०) एका ७५ वर्षीय इसम कोरोना पॉझीटीव्ह आढळुन आलेला आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यात रु ई येथे भरलेल्या बाजारामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
(फोटो २१ रुई,१,२)