‘गुड्डी’च्या स्मृतिनिमित्त शेकडो श्वानांना चॉकलेट, फळे, दूध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:19 AM2021-09-17T04:19:32+5:302021-09-17T04:19:32+5:30
टकले नगरमधील रहिवासी मंजिथिया कुटुंबातील गुड्डी हे श्वान घरचाच एक सदस्य बनून गेले होते. सामान्य माणसासारखे स्टीलच्या ताटलीत डोसा, ...
टकले नगरमधील रहिवासी मंजिथिया कुटुंबातील गुड्डी हे श्वान घरचाच एक सदस्य बनून गेले होते. सामान्य माणसासारखे स्टीलच्या ताटलीत डोसा, उत्तप्पा, दही भात, पुलाव, चॉकलेट, दूध हे पदार्थ खायची. तिचे अचानक निधन झाल्याने त्याचा धक्का बसलेल्या मंजिथया कुटुंबाने स्मशानभूमीत पुरताना तिच्याबरोबर साडीसह पेडीग्रे खाद्याचा मोठा बॉक्स ठेवण्यात आला. तसेच घरातील कुणी व्यक्ती गेल्यावर जसे दहाव्याला पूजापाठ आणि त्यानंतर अन्नदान केले जाते, त्याप्रमाणेच दहाव्याचा विधीदेखील तिचा फोटो लावून पार पाडण्यात आला. त्यानंतर विल्होळी येथील खतप्रकल्पानजीकच्या श्वान निर्बीजीकरण केंद्रात जाऊन तेथील २०० हून अधिक श्वानांना गुड्डीला आवडणारे पदार्थ त्या श्वानांना खाऊ घालण्यात आले. सुमारे ५०० चपात्या, डोसा, उत्तप्पा असे सारे काही खायला घालून तिच्या आत्म्याला शांती लाभावी, यासाठी मुरलीधर मंजिथया, प्रमिला, प्रणम्या आणि प्रणव यांनी प्रार्थनादेखील केली. पाळीव प्राण्याबाबतही काही कुटुंबीयांच्या मनात असणाऱ्या आत्मीयतेचे ते प्रातिनिधिक दृश्य होते.
फोटो
१६पीएचएसपी ६५
घरातीलच एक सदस्य बनलेल्या गुड्डी या श्वानाचे अचानक निधन झाल्याने शोकसागरात बुडालेल्या कुटुंबीयांनी त्या गुड्डीला आवडणारी फळे, चॉकलेट शेकडो श्वानांना खाऊ घालण्यात आले.
(छाया : नीलेश तांबे)