टॅँकर पलटी झाल्याने शेकडो लिटर इंधन वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:40 PM2018-04-11T12:40:39+5:302018-04-11T12:40:39+5:30

नांदगाव- नांदगांवनजीक पोखरी गावाजवळील मन्याड नदीच्या वळणावर भरधाव वेगाने जाणारा तेल टँकर पलटी झाल्याने शेकडो लिटर इंधन वाया गेले.

Hundreds of fuel wasted due to a tanker turnover | टॅँकर पलटी झाल्याने शेकडो लिटर इंधन वाया

टॅँकर पलटी झाल्याने शेकडो लिटर इंधन वाया

googlenewsNext

नांदगाव- नांदगांवनजीक पोखरी गावाजवळील मन्याड नदीच्या वळणावर भरधाव वेगाने जाणारा तेल टँकर पलटी झाल्याने शेकडो लिटर इंधन वाया गेले. सुदैवाने प्राणहानी झाली नाही. यावेळी टँकरमधील गळती होणारे तेल घेण्यासाठी नागरिकांनी गदेी केली होती .तेल टँकर पलटी झाल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक यु.बी.पद्मणे घटनास्थळी दाखल झाले. पानेवाडी हिंदुस्थान पेट्रोलीयममधून १५ हजार लिटर डिझेल व पाच हजार लिटर पेट्रोल भरून नांदगांवहून औरंगाबदरोडने शहागडकडे घेउन जातांना सदरचा टँकर क्रमांक एम एच ०४/ई बी १९६७ वळणावरील भरावावर वाहन चालक समाधन भापकर याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रोडच्या बाजूलाच पलटी झाला. प्रचंड आवाज झाल्याने नागरिक घटनास्थळी जमा झाले. पेट्रोल व डिझेल गळती होताना बघून मिळेल त्या भांड्यात डब्यात डिझेल व पेट्रोल भरु न घेउन गेले. टँकर मालक मच्छिंद हासळे रा . पांझन धोटाणे यांनी सोबत दुसरा तेल टँकर आणून उरलेले इंधन त्यात भरले. शेकडो लिटर इंधन जमिनीत जिरले तर काही लोकांनी वाहून नेले. दरम्यान याच रस्त्यावर मागील महिन्यात झालेल्या अपघातात दोन शेतकरी ठार झाले होते. तसेच दहा महिन्यांपूर्वी गॅस सिलेंडरने भरलेला मालट्रक याच ठिकाणी पलटी झाला होता.

Web Title: Hundreds of fuel wasted due to a tanker turnover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक