शेकडो घरांची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 01:01 AM2018-06-06T01:01:01+5:302018-06-06T01:01:01+5:30
नांदूरशिंगोटे : सोमवारी झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसाने सिन्नर तालुक्यातील गोंदे गावाला मोठा तडाखा बसला असून, शेकडो घरांची पडझड झाली आहे. शेतमाल, वाहने यांनाही फटका बसला असून, अंगावर पत्रा पडल्याने एक महिला गंभीर जखमी झाली आहे. गोंदे येथे मंगळवारी (दि. ५) जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, सिन्नर पंचायत समितीच्या सभापती सुमन बर्डे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित विभागाना दिल्या आहेत.
नांदूरशिंगोटे : सोमवारी झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसाने सिन्नर तालुक्यातील गोंदे गावाला मोठा तडाखा बसला असून, शेकडो घरांची पडझड झाली आहे. शेतमाल, वाहने यांनाही फटका बसला असून, अंगावर पत्रा पडल्याने एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
गोंदे येथे मंगळवारी (दि. ५) जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, सिन्नर पंचायत समितीच्या सभापती सुमन बर्डे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित विभागाना दिल्या आहेत.
सिन्नर तालुक्यातील काही भागात रोहिणी नक्षत्राच्या पहिल्याच पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. शनिवारी रात्री दापूर, चापडगाव, धुळवड, सोनेवाडी या भागाला मान्सूनपूर्व पावसाने तडाखा दिल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोमवारी दिवसभर वातावरणात असह्य उकाडा असल्याने दुपारपासून पावसाचे वेध लागले होते. यावेळी गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, तालुका कृषी अधिकारी अरुण दातीर, सरपंच उषा दत्तात्रय सोनवणे, विस्तार अधिकारी पी.एम. बिब्वे, कृषी पर्यवेक्षक राजेंद्र बिन्नर, कृषी सहायक दादासाहेब जोशी, ग्रामसेवक मच्छिंद्र भणगीर, तलाठी जे.यू. परदेशी, सुभाष रणशेवरे, भागवत तांबे, दत्तात्रय सोनवणे, बाळासाहेब तांबे उपस्थित होते.सिन्नर तालुक्यातील नळ पाणीपुरवठा योजना कोलमडल्यामान्सूनपूर्व पावसाने वादळीवाऱ्यासह जोरदार हजेरी लावल्याने शेतमालाचे व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोनेवाडी, चापडगाव व गोंदे परिसरात गेल्या तीन दिवसांपासून विजेचे खांब वाकल्याने व वीजवाहिन्या खंडित झाल्याने भोजापूर धरण परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. वादळाचा फटका वीज यंत्रणेवर झाल्याने ठिकठिकाणी त्याचा परिणाम झाला असून, पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत.
भोजापूर धरणातून मनेगावसह १६ गावे व कणकोरीसह ५ गावे नळ पाणीपुरवठा योजना ठप्प झाली आहे. त्यामुळे २१ गावांत कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. भोजापूर धरणाच्या पाण्यावरच परिसराचे भवितव्य अवलंबून असल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तसेच नांदूरशिंगोटे व दापूर वीज उपकेंद्राचा गेल्या २४ तासांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागणार आहे.दापूर व गोंदे परिसरात सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास जोरदार वारा
सुटला. त्यानंतर वादळाने उग्र्रअवतार धारण केल्याने शेतकºयांची एकच धावपळ उडाली. ७ वाजेच्या सुमारास वादळासह पावसाने सुरु वात केली होती. सुमारे दोन तास झालेल्या जोरदार वाºयासह पावसाने हाहाकार उडाला होता.
४वाड्या-वस्त्यांवर राहणाºया लहान कुटुंबातील घरांचे छत उडाल्याने संसार रस्त्यावर आले आहेत. पडवीत असणाºया शोभा राधाकिसन तांबे (४५) यांच्या अंगावर पत्रे पडल्याने जखमी झाल्या आहेत. शंभरच्या आसपास घरांचे नुकसान झाले असल्याचे समजते. वादळामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत, काही ठिकाणी विजेचे खांब वाकले तर वीजवाहिन्या रस्त्यावर पडल्या आहेत. जनावरांचे गोठे, डाळिंबबागा कोलमडून पडल्या आहेत. दत्तात्रय सोनवणे यांचे ट्रॅक्टर, एम.डी. तांबे यांची वॅगनर गाडीवर झाडे पडल्याने नुकसान झाले आहे. भागवत तांबे यांच्या डाळिंबबागासह शेतात उभ्या असलेल्या वालवड, टोमॅटो, कांदा आदीसह पिकांचे नुकसान झाले असून, शेतात उघड्यावर असलेला जनावरांचा चारा भिजल्याने शेतकºयांपुढे संकट उभे राहिले आहे. नांदूरशिंगोटे, दोडी, माळवाडी, दापूर, चापडगाव, भोजापूर आदी भागात सोमवारी रात्री उशिरा पावसाने हजेरी लावली होती. रोहित्र खराब झाल्याने रात्रभर वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता.