खात्याची माहिती घेऊन दीड लाखाची फसवणूक

By admin | Published: October 16, 2014 09:31 PM2014-10-16T21:31:28+5:302014-10-17T00:10:37+5:30

खात्याची माहिती घेऊन दीड लाखाची फसवणूक

Hundreds of information frauds with account information | खात्याची माहिती घेऊन दीड लाखाची फसवणूक

खात्याची माहिती घेऊन दीड लाखाची फसवणूक

Next

 

नाशिक : बँकेतील खातेदाराची माहिती हॅक करून बचत खात्यातील सुमारे दीड लाख रुपये परस्पर ट्रान्सफर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़
हिरवेनगरमधील मंगलप्रभात सोसायटीत राहणारे प्रणव प्रदीप परुळेकर यांचे शरणपूररोडवरील आयसीआयसीआय बँकेत खाते आहे़ १८ सप्टेंबर ते १३ आॅक्टोबर या कालावधीत त्यांच्या बँक खात्याची माहिती हॅक करून त्यांच्या खात्यातील ५७ हजार २२५ रुपये, तर त्यांच्या सहकाऱ्याच्या खात्यातून ८९ हजार ३९१ असे एकूण १ लाख ३९ हजार ६१६ रुपये भामट्याने परस्पर आॅनलाइन ट्रान्सफर करून घेतले़ या प्रकरणी परुळेकर यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, आयटी अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Hundreds of information frauds with account information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.