शेकडो दिव्यांनी उजळले इंद्रकुंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:53 IST2018-11-24T00:52:53+5:302018-11-24T00:53:19+5:30
झेप सांस्कृतिक कला-क्र ीडा मित्रमंडळाच्या वतीने पौर्णिमेनिमित्ताने इंद्रकुंड देवस्थान येथे सुमारे २१०० दीपप्रज्वलित करण्यात येऊन पूजन करण्यात आले.

झेप सांस्कृतिक कला- क्र ीडा मित्रमंडळाच्या वतीने पंचवटीतील इंद्रकुंड देवस्थान येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त २१०० दीप प्रज्वलित करण्यात येऊन देवदिवाळी साजरी करण्यात आल्याने इंद्रकुंड परिसर उजळून निघाला होता.
पंचवटी : येथील झेप सांस्कृतिक कला-क्र ीडा मित्रमंडळाच्या वतीने पौर्णिमेनिमित्ताने इंद्रकुंड देवस्थान येथे सुमारे २१०० दीपप्रज्वलित करण्यात येऊन पूजन करण्यात आले. शुक्रवार (दि.२३) सायंकाळी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्ताने झेप मंडळाच्या वतीने देवस्थान परिसरात दीपप्रज्वलित करण्यात आले. यावेळी आमदार हेमंत टकले, विलास लोणारी, डॉ. प्रदीप पवार, माजी महापौर अशोक मुर्तडक, डॉ. प्रताप वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड आदी मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. नगरसेवक गुरु मित बग्गा यांनी कार्यक्र माचे आयोजन केले होते. यावेळी देवेंद्र पटेल, रवींद्र पुजारी, राजू खांदवे, मिलिंद गोसावी, अशोक दोंदे, आदी उपस्थित होते.