भीषण वनव्यात निष्पाप शेकडो चिमणी पाखरे भस्म; ससा, मूंगूस यांची बचावासाठी धावधाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 02:27 PM2022-03-05T14:27:47+5:302022-03-05T14:27:58+5:30

वनविभाग,आपत्ती व्यवस्थापन टीम व वनकमिटी अद्यक्ष यांनी आटोकाट प्रयत्न करीत आग शांत केली परंतु धुरांचे लोट कायम होते त्यातच हवा आली की पुन्हा आग भडकत होती.

Hundreds of innocent birds burned in the fierce forest; Run for the rescue of rabbit and mongoose | भीषण वनव्यात निष्पाप शेकडो चिमणी पाखरे भस्म; ससा, मूंगूस यांची बचावासाठी धावधाव

भीषण वनव्यात निष्पाप शेकडो चिमणी पाखरे भस्म; ससा, मूंगूस यांची बचावासाठी धावधाव

Next

शाम धुमाळ

कसारा - अचानक लागलेल्या महाकाय वनव्यात डोंगर टेकड्यावरील झाडा झुडपात वास्तव्यास असलेल्या निष्पाप पाखरांचा बळी गेला काही पाखरांना व ससा ,मूंगूस यांना वाचवण्यात आले असून या वनव्यामुळे मोठ्या प्रमाणात वन संपदा नष्ट झाली आहे.

आज दुपारी 12 च्या सुमारास  मोखावणे येथील डोंगराला अचानक आग लागली अचानक लागलेली आग त्याच दरम्यान सुटलेला वारा या मुळे आगीचे  प्रमाण वाढले व तब्बल एक किमी चा डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला वणवा लागल्याचे समजताच आपत्ती व्यवस्थापन टीम चे सदस्य राकेश पाटील,महेंद्र माने यांनी सहकाऱ्या सोबत वणवा वीजवणे कामी धाव घेतली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत असताना काही जणांना आगी ची तीव्रता जाणवली या घटनेची तात्काळ वनविभागास माहिती देऊन त्यांची मदत बोलवली.

वनविभाग,आपत्ती व्यवस्थापन टीम व वनकमिटी अद्यक्ष यांनी आटोकाट प्रयत्न करीत आग शांत केली परंतु धुरांचे लोट कायम होते त्यातच हवा आली की पुन्हा आग भडकत होती. हे सर्व करीत असताना अनेक पाखरे जळून खाख झाल्याचे निदर्शनास आले तर काही  पाखरे जखमी झाली जखमी होऊन पडलेल्या पाखरांना राकेश पाटील व महेंद्र माने यांनी अलगद पणे उचलून एका कापडी पिशवीत भरले व त्यांना सुरक्षित स्थळी आणले तिथे त्यांना पाणी वैगरे पाजून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना सुरक्षित ठेवले..मात्र याचं दरम्यान अनेक ससे (चॉकलेटी रंगाचे) ,मुंगुस,आगी पासून बचाव व्हावा यासाठी सैर वैर पळत होते  भीतीने व्याकुळ झालेल्या सश्यांना देखील सुरक्षित ठिकाणी सोडण्यात् आले.दरम्यान हा वणवा लागला की कोणी लावला याबाबत वनविभाग कसारा विहिगाव यांचे कडून तपास सुरु असला तरी या महाकाय वनव्या मुळे शेकडो पक्षी,पाखरे ,पक्ष्याची अंडी भस्मसात झाली असून साग,खैर,धावडा सारखी झाडें व वंन्औषधी नष्ट झाली आहेत.

Web Title: Hundreds of innocent birds burned in the fierce forest; Run for the rescue of rabbit and mongoose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग