‘रन फॉर युनिटी’त धावले शेकडो सिन्नरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 03:46 PM2020-01-04T15:46:31+5:302020-01-04T15:47:06+5:30

पोलीस रेझींग डे निमित्ताने नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या संकल्पनेतून आणि अप्पर पोलीस अधीक्षक शर्मीष्ठा घारगे - वालावलकर, पोलीस उपअधीक्षक माधव पडिले यांच्या नियोजनातून सिन्नर पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित ‘रन फॉर युनिटी’ या मॅरेथॉन स्पर्धेत शेकडो सिन्नरकर अबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी होत धावले.

Hundreds of Sinnarkar run in 'Run for Unity' | ‘रन फॉर युनिटी’त धावले शेकडो सिन्नरकर

सिन्नर येथे पोलीस ठाण्याच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एकता दौड चे हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करतांना पोलीस अधीक्षक माधव पडिले. समवेत नगराध्यक्ष किरण डगळे, तहसीलदार राहुल कोताडे, बाळासाहेब वाघ, साहेबराव पाटील आदि.

Next
ठळक मुद्देएकता दौड : सिन्नर पोलिसांच्या पुढाकारातून पाच किलोमीटरची मॅरेथॉन

सिन्नर : पोलीस रेझींग डे निमित्ताने नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या संकल्पनेतून आणि अप्पर पोलीस अधीक्षक शर्मीष्ठा घारगे - वालावलकर, पोलीस उपअधीक्षक माधव पडिले यांच्या नियोजनातून सिन्नर पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित ‘रन फॉर युनिटी’ या मॅरेथॉन स्पर्धेत शेकडो सिन्नरकर अबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी होत धावले.
पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात पोलीस आणि नागरिकांमध्ये संवाद वाढीस लागावा यासाठी लक्ष देण्यात आले आहे. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून येथे रन फॉर युनिटी या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेला सुरूवात होण्यापूर्वी उपविभागीय पोलीस अधिकारी माधव रेड्डी(पडिले) यांनी प्रास्ताविकातून स्पर्धा आयोजनाचा उद्देश सांगीतला.
यावेळी नगराध्यक्ष किरण डगळे, तहसीलदार राहुल कोताडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, जिल्हा परिषद सदस्य सिमांतीनी कोकाटे, नामदेव कोतवाल, हरीभाऊ तांबे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील, मानव संसाधन शाखेचे पोलीस निरीक्षक विष्णु आव्हाड, पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील, अशोक रहाटे, सहायक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, राजेंद्र रसेडे आदी उपस्थित होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी माधव रेड्डी यांनी हिरवा झेंडा दाखवून या मॅरेथॉनचा प्रारंभ केला. सकाळी ठीक ८ वाजता सिन्नर तहसिल कार्यालयासमोरून निघालेली एकता दौड बारागाव पिंप्री रस्त्याने अडीच कि.मी. आणि पुन्हा परतीचे अडीच कि.मी. असे एकुण पाच कि. मी. चे अंतर कापून सुरूवात झाली त्याच ठिकाणी स्पर्धेचा समारोप झाला. स्पर्धेत शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी, पोलीस दलातील कर्मचारी, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच सिन्नरकर नागरिक मोठ्या संंख्येने सहभागी झाले होते.
प्रथम तीन क्र ामांकाचे स्पर्धक
पुरूष गट-प्रथम - मोहन गिरे,द्वितीय - सुनील कातोरे,तृतीय - कृष्णा वाघ,महिला गट- प्रथम - शारदा आव्हाड,द्वितीय - अश्विनी आंबेकर,तृतीय - अश्विनी वारुंगसे

Web Title: Hundreds of Sinnarkar run in 'Run for Unity'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.