शिवसेना प्रणित युवा सेनेच्या कार्यकर्त्यांसह शेकडो तरुण नाशिकमध्ये शिरोडकर यांच्या उपस्थितीत ‘मनविसे’त दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 04:58 PM2017-11-26T16:58:37+5:302017-11-26T17:02:05+5:30
सुमारे दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी मनविसेमध्ये प्रवेश केला असून यामध्ये काही युवा सेनेचे कार्यकर्त्यांचाही समावेश असल्याचे शिरोडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. ग्रामिण भागात संघटन बळकट करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. कोणाच्याही विश्वासाला मनविसेमध्ये तडा जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
नाशिक : मनसेच्या ‘राजगड’ कार्यालयावर रविवारी (दि.२६) शिवसेनेच्या युवा सेनेच्या काही कार्यकर्त्यांसह शेकडो नवीन विद्यार्थ्यांनी शिरोडकर यांच्या उपस्थितीत मनविसेमध्ये प्रवेश केला. यावेळी शिरोडकर यांनी नवीन कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना सांगितले. राज ठाकरे यांचे नेतृत्व सर्वांना समान संधी देणारे आहे. त्यामुळे नवीन-जुना असा कुठलाही भेदभाव संघटनेत चालत नाही. जो प्रामाणिकपणे काम करुन संघटन बळकट करण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी ठेवतो त्याला नक्कीच जबाबदारी सोपविली जाते. त्यामुळे कुठल्याही कार्यकर्त्यांनी मनामध्ये न्युनगंड न बाळगता मनसेच्या बळकटीसाठी प्रयत्नशील रहावे, असे शिरोडकर यावेळी म्हणाले. सुमारे दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी मनविसेमध्ये प्रवेश केला असून यामध्ये काही युवा सेनेचे कार्यकर्त्यांचाही समावेश असल्याचे शिरोडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. ग्रामिण भागात संघटन बळकट करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. कोणाच्याही विश्वासाला मनविसेमध्ये तडा जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. दरम्यान, महिनाभरानंतर प्रत्येक नवीन कार्यकर्त्याशी चर्चा करुन सामाजिक कार्याचा आढावा घेत नवीन पदे व जबाबदारी सोपविली जाणार असल्याचे शिरोडकर यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी व्यासपीठावर मनविसेचे राज्यउपाध्यक्ष खंडेराव मेढे, जिल्हाध्यक्ष गणेश मोरे, शहराध्यक्ष श्याम गोहाड, संदीप भवर, दिपक चव्हाण, सागर देवरे, मनोज रामराजे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
महाविद्यालयीन निवडणूका घ्याव्या
महाविद्यालयीन वयात राजकिय नेतृत्वगुण विकसीत होण्यासाठी महाविद्यालयीन निवडणूका महत्त्वाच्या ठरतात. या निवडणूका घेतल्या जाव्या यासाठी मनविसेची नेहमीच सकारात्मक भूमिका राहिली आहे; मात्र निवडणूकांचा कार्यक्रम महाविद्यालयीन स्तरावर आखताना आचारसंहिता कडक असणे देखील तितकेच गरजेचे असल्याचे शिरोडकर म्हणाले.